येक चित्त करुनी मना ॥ नित्य ध्यांई गजानना ॥
ह्मणा नाम मोरयाचें ॥ सकळ कारण जन्माचें ॥धृ०॥
जें जें इच्छिसील मनीं ॥ तें तें तुज देईल तत्क्षणीं ॥
ह्मणा नाम मोरयाचें ॥१॥
भुक्ति मुक्तिचें आरत ॥ ध्यारे मोरया दैवत ॥
ह्मणा नाम मोरयाचें ॥ स० ॥२॥
आणिक कष्ट नको करुं ॥ नित्य ध्यारे विघ्नहारु ॥
म्हणा नाम मोरयाचें ॥स० ॥३॥
येवढा महिमा ज्याचे पायीं ॥ तो देव आम्हा जवळी आहे ॥
ह्मणा नाम मोरयाचें ॥स० ॥४॥
मोरया गोसावी विनटला ॥ तेणें उपदेश सांगितला ॥
ह्मणा नाम मोरयाचें ॥ सकळ कारण जन्माचें ॥५॥