चला जाऊं मोरेश्वरा ॥ पाहूं आजि तोची ॥
आह्मी गेलों मोरेश्वरा ॥ पाहूं आजी डोळा ॥१॥
रुप पाहूनी नयनीं ॥ सुख वाटे जीवा ॥
ऐसें रुप तें पाहिलें ॥ धरिलें हृदयीं तेची ॥२॥
काय सांगूं मी ती गोडी ॥ लागे आजी तुझी ॥
बहू वेधू हा लागला ॥ दाखवी चरण (पाय) मज ॥३॥
तुजवीण देव नेणें ॥ जन्मो जन्मीं तोही ॥
कृपा करुनी दिधला ॥ आजि देवराया ॥४॥
मोरया गोसावी दातार ॥ आम्हा देतो वर ॥
म्हणूनियां धावें तेथें ॥ मज आजि तोची ॥५॥
चिंतामणी दास तुझा तुज मागतसे ॥ चरणी ठाव मज देंई ॥ कोठें नव जाय ॥६॥