उद्धरिलें जीवा नकळे तुझा महिमा ॥
ह्मणुनि तुझीया नामा शरण आलों बाप ॥१॥
आहो जडजीव तारिले संख्या नाहीं त्यासी ॥
आस तूं आमूची पुरवीं देवा बाप ॥२॥
आहो भवार्णवीं बुडतों धांवे धांउनियां ॥
तेथील यातना काय सांगुं बाप ॥३॥
आहो यातनेचें भय लागलों कांसे ॥
न धरी तूं उदास दिना (दासा) लागीं बाप ॥४॥
आहो तूझिया नामस्मरणें पापें झाली दहन ॥
रात्रंदिवस चिंतन आहे मज बाप ॥५॥
आहो तुझीया चरण कमळीं मन माझें लुब्धलें ॥
दास चिंतामणी विनवितसे बाप ॥६॥