मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
प्रथम नमन करुं एकदंता ॥ स...

मोरया गोसावी - प्रथम नमन करुं एकदंता ॥ स...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


प्रथम नमन करुं एकदंता ॥ सकळा सिद्धिचा दाता तुचि एक ॥

तुझिया चरण प्रसादें ॥ पावति मुक्तिपदें ह्मणुनिया आंनदें ॥ ध्यायें तुज बाप ॥१॥

आहो जय जय जय उदारा स्वामि विघ्नहारा ॥

आहो नमन मोरेश्वरा परिस माझें ॥धृ॥

सकळासि तूं आदि ॥ ब्रह्मा तुह्मा तें वंदि ॥

देवा ह्मणूनि चहूं वेदि नाम तुझें ॥

त्रिपुरावधी शंकर ॥ स्मरलासि आदरें ॥

शेष पृथ्वी धरितां ॥ स्तवन केले बाप ॥२॥

महिषासुरमयनीं ॥ स्तुति करिती भवानीं ॥

आहो ऋषिमुनीं जनीं प्रार्थिलासे ॥

जाणावा हा विश्व ॥ ध्यायीं पंचबाण ॥

ह्मणोनी गजानन ॥ नाम तुझें बाप ॥३॥

बळिने देतां दान ॥ स्मरलासि विघ्नविनाशन ॥

आहो ह्मणोनि झाला जाण चिरंजीव ॥

ज्या जैसें ध्याति ॥ त्या तैसा पावसी ॥

ह्मणोनि सहस्त्र नाम ॥ मोरयासि बाप ॥४॥

मोरेश्वरीं आदिस्थान ॥ या समागमें चिंचवडासी झालें येण ॥

देवा भक्तिभाव पूर्ण देखियेला ॥ मोरयाचें चरण ॥

धरोनिया जीवी ॥ मोरया गोसावी दास तुझा बाप ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP