पावें पावें एक वेळां ॥ तुज विनवितों दयाळा ॥
वाट तुझी पाहातों डोळां ॥ भेटि देंई तूं मजला ॥१॥
ध्यान लागलें लागलें ॥ मन वेधलें वेधलें ॥धृ०॥
तुझिया नामाचा मज भरंवसा ॥ कधीं तुज देखेन विघ्नेशा ॥
देह झाला उतावळा ॥ चरणीं तुझ्या विनटला ॥ध्यान ला० ॥२॥
तूं विघ्नाचा नायकू ॥ होसील विघ्नाचा छेदकू ॥
देव नेणें मी आणिक ॥ दीना कोण सोडविता ॥ध्यान ला० ॥३॥
तूं त्रैलोक्य दाता चिंतामणी ॥ दुजा नेणो त्रिभवनी ॥
विनवी दास चिंतामणी ॥ तुझ्या वेधलों चरणीं ॥
ध्यान लागलें लागलें ॥ मन वेधलें वेधले ॥४॥