सुखे नांदत होतें मी संवसारीं हो ॥
तव अवचित झालें (येतें) परि हो ॥
मज हो संचार झाला ये शरीरीं हो ॥
मज नेउनी घाला मोरेश्वरीं हो ॥
बाई ये (सुंदरे) हो दैवत लागलें मोरगांवीचें ॥१॥
अहो उतरुं न शके कोणी साचें ॥
बाई ये हो दैवत लागले मोरगांवीचे ॥२॥
अहो सकळिक ह्मणती झाली झडपणीं हो ॥
बोलवा पंचाक्षरीं करा झाडणी हो ॥३॥
अहो मंत्र रक्षा नचले येथें कांहीं हो ॥
देह भाव गुंतला मोरया पायीं हो ॥४॥
माझें तनूमन गुंतलें मोरया पायीं हो ॥
नेणतो बापुडीं करिती जाचणी हो ॥५॥
अहो दास तुझा मोरया हो (गोसावी) हो ॥
या हो मोरया वेगळें नेणें कांहीं हो ॥६॥
बाई येहो दैवत लागलें मोरगांवीचें ॥
अहो उतरु नशके कोणी साचें ॥बाई हो०॥७॥