तुझें तुला देतां काय जावें ॥ प्राण्या नकळें हो कांहीं ॥
लटकाची अहंकार वाढविला ॥ साधी तोचि पापाला ॥
माझें माझें किती ह्मणसी ॥ सर्वही टाकून जासी ॥
अहो जय जय जय गणराज ऊदारा ॥१॥
सकळिक राहिल येथेंची ॥ मग बापुडा होसी ॥
पुत्र हेचि तेथें राहती ॥ तैसि तेचि हो पत्नी ॥
यम तुज दंड मारिती ॥ काकुलती हो येसी ॥
अहो जय जय जय गणराज ऊदारा ॥ अहो करुणा कांहीं त्याला नये रे ॥
ऐसें जाणून तेही ॥ आपुलें हित तेहि करावें ॥
मोरयासी भजावें ॥ जप तोहि त्याचा करावा ॥
पापें जाळून टाका ॥ अहो जय०ग०ऊ० ॥३॥
अहो शुद्ध तेचि बापा होऊनी ॥ जांई स्वानंद लोका ॥
ऐसें हित तेचि सांगती ॥ मोरया गोसावी दातार ॥
चला जाऊं पाहुं तयाला ॥ तोचि (हाथी) भेटेल आतां ॥अहो जय०ग०ऊ० ॥४॥
अहो चिंचवडीं तोचि राहिला ॥ चिंतामणीं पाहिला ॥
भेद तोचि नाहीं तयाला ॥ ऐसें कळूनी त्याला ॥
मग सोय धरी देवाची ॥ चिंतामणी चरणाची (पायाची) ॥अहो जय०ग०ऊ० ॥५॥
अहो ह्मणुनियां आवडी लागली ॥ गणराज चरणीं ॥
चिंतामणी तोचि पाहावा ॥ ऐसें धरुनी मनीं ॥
चिंतामणी दास विनवी ॥ भक्ति आपूली द्यावी (सेवा आपूली घ्यावी) ॥अहो जय०ग०ऊ०॥
अहो न्यावें त्वांचि माहेरा ॥अहो जय० गणराज ऊदारा ॥६॥