मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
मज सुख पावले हो ॥ मोरया द...

मोरया गोसावी - मज सुख पावले हो ॥ मोरया द...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


मज सुख पावले हो ॥ मोरया देखिला हो ॥

श्रम माझा हारला हो ॥ केलें निघ्नेश भजन ॥

तेणें नाशिलें मी तूंपण ॥१॥

यातायाती मी चकलों ॥ चरणी तुझ्या विनटलों ॥२॥

घेतां नाम तुझें वाचें ॥ भय नाहीं रे दोषाचें ॥३॥

न करितां तपतीर्थ ॥ कृपा केली गणनाथ ॥४॥

पूर्वपुण्य जोडी झाली ॥ भेटली गणराज माऊली ॥५॥

भाग्योदय थोर माझा ॥ शरण आलों मी गणराजा ॥६॥

विनवी चिंतामणीदास ॥ अखंड देई भक्तिरस ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP