मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
बाळसंतोष (मोरया गोसाव्यां...

मोरया गोसावी - बाळसंतोष (मोरया गोसाव्यां...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


बाळसंतोष (मोरया गोसाव्यांचा)

आह्मां एकदां मोरेश्वरा ॥

दान देंई तूं सत्वर ॥ बाबा बाळसंतोष ॥

निरसी दुष्ट हा संसार ॥ बाबा बाळसंतोष ॥१॥

प्रपंच शिणलों बहूत देवा ॥

काहीं न घडे रे तुझी सेवा ॥ बाबा बा०॥

ऐसा अपराधी मी देवा ॥ ब.बा बा० ॥२॥

ऐसा अपराधी मी तुझा जन्मोजन्मीं ॥

नाहीं घडलें रे स्मरण नाभीं ॥ बाबा बा० ॥

नको कोप रे धरुं स्वामी ॥ बाबा बा० ॥३॥

तुजविण नाहीं देव दुजा ॥ हेंचि सत्य रे गणराज ॥बाबा बा०॥

चुकवी भव रे मायापाश ॥ बाबा बा० ॥४॥

भव सागर तरावया ॥ उपाय नाम हें मोरया ॥ बाबा बा० ॥

करी मज रे पूर्ण दया ॥ बाबा बा० ॥५॥

तुझे दयेवीण जन्म काय ॥ जैसा प्राणा रे (वीण) देह ॥बाबा बा० ॥

माझा देह रे लावी सेवे ॥ बाबा बाळ० ॥६॥

जरी देवराया कृपा करीसी ॥ मग सार्थक जन्मासीं ॥बाबा बा० ॥

नको चाळऊं जीवासीं ॥ बाबा बा० ॥७॥

माझे पदरीं नाहीं पूर्व संचित ॥ पुरवीं माझें रे मनोरथ ॥ बाबा बा० ॥

तुझें नाम रे दिनानाथ ॥ बांबा बा० ॥८॥

दिनानाथ नाम हें करावें ॥ दिनरंक रे उद्धरावे ॥ बाबा बा० ॥

आपुलें प्रेम रे मज द्यावें ॥ बाबा बा० ॥९॥

तुझें प्रेम जया लाधलें ॥ ते हो संसार चुकले ॥ बाबा बा० ॥

त्यासीं पुन्हां रे नाहीं येणें ॥ बाबा बा० ॥१०॥

मोरेश्वरा तूं माझें सर्व तप जाण ॥

न सोडी तुझें बा चरण ॥ बाबा बा० ॥

ऐसा निश्चय सत्य जाण ॥ बाबा बा० ॥११॥

ह्मणोनियां प्रेम द्यावें झडकरी ॥

दास मोरया विनंती करी ॥ बाबा बा० ॥

दिनरक रे (दिनरंकासी) उद्धरी ॥बाबा बा० ॥११॥

बाबा बाळसंतोष ॥ बाबा बाळसंतोष ॥

बाबा बाळसंतोष ॥ दिनरंक रे (दिनरंकासी) उद्धरीं ॥बाबा बाळसंतोष॥

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP