शुक्लपक्षातली चतुर्दशी दुसर्या दिवसाची घ्यावी आणि कृष्ण पक्षातली पहिल्या दिवसाची घ्यावी. जे कोणी शिवरात्रीचे काम्यव्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्णचतुर्दशीला करतात, त्यांनी त्या व्रताकरिता, महाशिवरात्रीप्रमाणे, मध्यरात्री व्याप्ति असस्णारी चतुर्दशी घ्यावी. तिची व्याप्ति जर दोन्ही दिवशी मध्यरात्री असेल, तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. कारण, प्रदोष कालालाच फक्त व्यापणारी जी असेल ती घ्यावी असे काहींचे मत आहे; परंतु अशा वेळी मूळाचा विचार केला पाहिजे. चतुर्दशीला दिवसास कधीही जेवण करू नये असा जो निर्णय, आणि त्याला अनुसरून जे वागतात, त्यांनी भोजनकालव्यापिनी चतुर्दशी सोडून, त्रयोदशीला आणि पौर्णिमेला जेवावे. ज्यांना शिवरात्रीव्रत असेल त्यांनी मात्र चतुर्दशीला पारणा करावी. अशांच्या बाबतीत, चतुर्दशी, अष्टमी वगैरे तिथींना दिवसा जेवणाचा जो निषेध सांगितला आहे, तो लागू नाही. याचे कारण असे की, विधीने प्राप्त झालेल्या गोष्टीत निषेध हा बाध करू शकत नाही. येथे चतुर्दशीच्या निर्णयांचा विसावा उद्देश संपला.