पूर्वी मलमासात जी कर्मे करणे वर्ज्य असल्याचे सांगितले आहे, ती कर्मे गुरु व शुक्र यांच्या अस्तात व त्यांचे बाल्य व वार्धक्य या अवस्था असल्या तरी वर्ज्य करावीत. अस्तापूर्वी सात दिवस वार्धक्य आणि उदयानंतर सात दिवस बाल्य मानणे हा मध्यम पक्ष होय. १५ दिवस, ५ दिवस, ३ दिवस वगैरे जे पक्ष सांगितले आहेत, ते आपत्ति, अनापत्ति, स्थलविशेष वगैरे गोष्टींचा विचार करून, ग्राह्य समजावे.