मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
दत्त तादात्म्य

श्रीदत्त भजन गाथा - दत्त तादात्म्य

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


दत्त आहे माझ्या ठायी । मी तो आहे दत्ताठायी ॥१॥
दत्त माझा आत्माराम । दत्त माझे परंधाम ॥२॥
शिवरुप माझे ठायी । दत्त वसे माझे ह्रदयी ॥३॥
माझे जे का स्वरुप जाणा । तेच दत्तात्रेय माना ॥४॥
स्वरुपभूत माझा दत्त । मज ठेवी अप्रमत्त ॥५॥
ज्ञान मज उपजवीतो । बोध मज प्रकाशितो ॥६॥
सर्वाठायी दत्त आहे । दत्तात्मक जग पाहे ॥७॥
दत्त हाच विश्वंभर । सकळांचा की आधार ॥८॥
दत्ताहुनी अन्य कांही । भिन्न नसे नसे पाही ॥९॥
एकचि दत्त पूर्ण असे । सर्व संवित्तिच वसे ॥१०॥
विनायकी परमात्मा । दत्त तोच प्रत्यगात्मा ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP