मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
श्राद्धविधी

श्रीदत्त भजन गाथा - श्राद्धविधी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता १९/९/१९२९
पितर तूं जाण सर्व जगताचा । विस्तार वंशाचा करिसी तूं ॥१॥
श्रद्धा धरोनियां यजन करितां । तुज समर्पितां भक्तिभाव ॥२॥
पितृस्वरुपी तूं जनार्दन देव । धरिसी तृप्तभाव श्रद्धेनेंच ॥३॥
आईबाप आजा पणजा निश्चिती । सपिंड जगतीं तूंच सारा ॥४॥
सकळ सृष्टीचा पालक पोषक । वंश विस्तारक तूंच एक ॥५॥
तूंच अन्नदाता तूंच विभवदाता । सकळांचा दाता तूंच एक ॥६॥
अंतरिक्ष स्वर्ग भूमीसी राहसी । इच्छित पुरवीसी तूंच नाथा ॥७॥
तुझ्या कृपे सर्व अभ्युदय होय । सिद्धीलागी जाय मनोरथ ॥८॥
म्हणोनि श्रद्धेने श्राद्ध समर्पितां । अन्नाचा करितां त्याग श्राद्धी ॥९॥
ब्राह्मणांसी प्रिय भोजन घालितां । सुवर्णांत देतां विप्रांलागी ॥१०॥
पूजन ब्राह्मणांचे प्रिय श्रीविष्णुला । करितां श्राद्धाला ऐशा योगे ॥११॥
आदित्य वसु पितर तृप्त होती । तेणे परम तृप्ती जनार्दना ॥१२॥
वेदवेत्ता द्विज देवता निश्चिती । तीर्थ पायांप्रति सर्व त्याच्या ॥१३॥
देवतमाय भला श्राद्धीय ब्राह्मण । धरावे चरण श्राद्धई त्याचे ॥१४॥
ऐसे श्रद्धायुक्त श्राद्ध समर्पितां । तोष भगवंता थोर होई ॥१५॥
अपराण्हकाळ येथे पितरांचा । मध्यान्हीसी साचा सूर्य येतां ॥१६॥
पूजोनि ब्राह्मणां भोजन घालावे । सुग्रास अन्न द्यावे विप्रांलागी ॥१७॥
पितर तृप्त होती आशीर्वाद देती । वाढत संतती थोर त्यांची ॥१८॥
निजांगे रक्षिती भगवान त्यांसी । जेका ब्राह्मणांसी अन्न देती ॥१९॥
दक्षणेने युक्त घृत पायसाचे । भोजन घाली साचे ब्राह्मणांसी ॥२०॥
क्षीर घृत मधु ब्राह्मणां वाढितां । पूजोनी तत्वतां आदराने ॥२३१॥
श्राद्ध पूर्ण होतां संतुष्टत देव । कल्याणाचा भाव प्राप्त होय ॥२२॥
तोय जरी दिले श्रद्धेने श्राद्धांत । तरी तृप्त होत जनार्दन ॥२३॥
बाप आजा आणि तसा तो पणजा । करुनियां गाजा बोलवावे ॥२४॥
पितृनामाचा की उच्चार करावा । श्रद्धायुक्त असावा श्राद्धकर्ता ॥२५॥
अग्नीकरण करितां पिंड समर्पीता । पितर तृप्तता पावताती ॥२६॥
कृतज्ञतेसाठी श्राद्ध सांगितले । पाहिजे आचरिले गृहस्थाने ॥२७॥
विनायक म्हणे दत्तभक्ती कर । तृप्त होती पितर भजनाने ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP