श्रीदत्त भजन गाथा - शबरी आख्यान
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
भिल्लिणीचा भाव पाहिला रामानी । अंतर भरोनी प्रेमे आले ॥१॥
भावनेचा राम तिचेपुढे उभा । भावनेची प्रतिमा मूर्तिमंत ॥२॥
तिचा प्रियभाव रामरुप झाला । पुढे प्रगटला रामरुपे ॥३॥
उद्धराया तीस काय राम करी । भक्षण ती करी फ़ळे सारी ॥४॥
पत्र पुष्प फ़ल तोयही प्रेमाने । अर्पितां मनाने देव तुष्ट ॥५॥
निषिद्ध न म्हणे करितो स्वीकार । देतसे ढेकर तृप्तिचे तो ॥६॥
रामराये फ़ळे भक्षिली रुचिने । बोलिले प्रेमाने शबरीसी ॥७॥
माझे ध्यान करी भजन माझे करि । ज्ञान तव अंतरी उपजेल ॥८९॥
ज्ञान होतां तूज मुक्त तूं होशील । कैवल्य पावशील बोले राम ॥९॥
विनायक म्हणे शबरी मुक्त झाली । भावनाद्वारे भली भाविक ती ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2020
TOP