मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
ईश्वरावर निस्सीम निष्ठा

श्रीदत्त भजन गाथा - ईश्वरावर निस्सीम निष्ठा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रात्रंदिन देव-सेवा । जन तुम्हीं करित जावा ॥१॥
देव मनी नित्य ठेवा । त्यासी अर्पा प्रेमभावा ॥२॥
अंतरांत देव ध्यावा । देव सदा प्रेमे गांवा ॥३॥
ह्रदयांत आदरावा । सुमने तेथे पूजावा ॥४॥
अंत:करणी चिंतावा । निजठायी तो पहावा ॥५॥
देहमन इंद्रियांत । ठेवा देव सदोदित ।६॥
देव चिंता देव गावा । वर्णा त्याचीया वैभवा ॥७॥
देवासाठी व्यवहार । करित रहा निरंतर ॥८॥
देवासाठी सर्व कांही । करावे तुम्ही नि:संदेही ॥९॥
अशन पान देवासाठी । स्नान दान देवासाठी ॥१०॥
निजने बसणे त्याचेसाठी । जागे असणे त्याचेसाठी ॥११॥
विहार जे का सर्व तुमचे । त्याचेसाठी व्हावे साचे ॥१२॥
विकार जे का तुम्हां होती । असावा त्यांत श्रीपति ॥१३॥
विचारांत देव असो । उच्चारांत देव वसो ॥१४॥
आचारांत देव राहो । विसर त्याचा कधी न हो ॥
इंद्रियांत देव ठेवा । रस त्याचा सदा सेवा ॥१६॥
देव पहा देव ऐका । देव हुंगा देव चाखा ॥१७॥
देव भोगा, अनुभवा  देवाठायी घ्या विसावा ॥१८॥
देवाठायी रंगा डोला । देवाठायीं जीव मिसळा ॥१९॥
विनायक म्हणे देव । पहावा त्याचा विश्वभाव ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP