मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
रमामाधव योग

श्रीदत्त भजन गाथा - रमामाधव योग

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रतिसह येत मदन सेवेसी । खुलवि रुपासी प्रभुजीच्या ॥१॥
भाळींचा हिमांशु अमृत स्त्रवत । करी ओली शीत देव तनु ॥२॥
शीतल भुजंग भूषण बनती । चमके अंगकांति शोभिवंत ॥३॥
गंधर्व आलापिती अप्सरा नाचती । किन्नर ते गाती सुमध्हुर ॥४॥
राग उपराग रागिणी घेवोनी । देवसेवेप्रती बोळंगती ॥५॥
नारद तुंबरु चरित वर्णिती । देवी ओवाळिती पंचारती ॥६॥
मदभरे गज स्व-रसे डुलती । जल उडविती सोंडेतूनी ॥७॥
विनायक म्हणे रमामाधवांचा । योग होत साचा गिरिवरी ॥८॥
==
सोळा वरुषाचे वय । ऐशी पद्मा तेव्हां होय ॥१॥
लावण्याची शुद्ध मूस । नाही वस्तु उपमेस ॥२॥
सौकुमार्याची की खनि । चारु हास शोभे वदनी ॥३॥
जोत्स्नेसही लाजवित । अमृतासी धिक्कारित ॥४॥
सुगंधाची जणुं बनली । एकवटुनि हे बाहुली ॥५॥
चेतन मूर्त की चित्ताचे । भाजनचि कामरसाचे ॥६॥
कंदुक क्रीडनांत रत । अल्लड स्वभावेसी येत ॥७॥
लक्षुनि देवाजीचा अंक । पावतसे बहु तोक ॥८॥
झेपावत तये स्थानी । बैसतसे उडी घालोनी ॥९॥
जोडा रमामाधवांचा । अद्वितीय जगी साचा ॥१०॥
विनायक म्हणे रंग । देव झाले बहु दंग ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP