मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती

श्रीदत्त भजन गाथा - भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


प्रगटता येथे धरा । गुरुराया अत्रिकुमरा ॥१॥
विघ्नां आमुच्या निवारा । वैरी आमुचे संहारा ॥२॥
अनुष्ठान भजनाचे । सिद्ध करवावे साचे ॥३॥
नाम संकीर्तन यज्ञ । श्रेष्ठ म्हणताती तज्ञ ॥४॥
कलियुगी हेच सार । हेच पुण्य असे थोर ॥५॥
ऐसा आहे अभिप्राय । सकलांचा दत्तात्रेय ॥६॥
भजन यज्ञ सिद्ध करा । निज कृपे येथे उदारा ॥७॥
चापबाण घ्यावे हाती । यज्ञासाठी रमापती ॥८॥
रक्षण करा या स्थानाचे । रक्षण करा नाम यज्ञाचे ॥९॥
म्हणुनि पाय मी वंदितो पुन्हां पुन्हां मी प्रार्थितो ॥१०॥
नाथ प्रगट खचित व्हावे । निर्भय स्थान हे करावे ॥११॥
वैरी सर्व निवटावे । विघ्नांलागी मुळी नासावे ॥१२॥
भय मृत्यु निवारावी । क्षेमशान्ती आम्हां असावी ॥१३॥
निरामयता आम्हां दासां । सदा असो ह्रन्निवासा ॥१४॥
विनायक भरंवसा । तुमचाच जगन्निवासा ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP