मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
परमेश्वराची शब्दातीतता

श्रीदत्त भजन गाथा - परमेश्वराची शब्दातीतता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


तूझी कृपा वर्णायासी । दीना मज मति कैसी ॥१॥
तूजसम तूच जगी । उपमा तुझी तुजलागी ॥२॥
अनुपम कळवळा । वात्सल्याचा तुज उमाळा ॥३॥
जिव्हाळ्याचा तूं जिव्हाळा । वर्णू काय तुज स्नेहाळा ॥४॥
तुझे ठायी शब्द-गति । कुंठित होय रमापति ॥५॥
वाचेहुनी पर अससी । वाचेलागी न गवससी ॥६॥
स्पर्शेनाच तुज वाचा । विषय नव्हेस वाचेचा ॥७॥
शब्दाशब्दां झुंजताती । झुंजता नव्हेस वाचेचा ॥७॥
शब्दाशब्दां झुंजताती । झुंजता ते मावळती ॥८॥
तुजपाशी न पोचती । मध्येच ते अदृश्य होती ॥९॥
शब्दें कैसे गौरवाने । अलंकृत कैसे करावे ॥१०॥
मध्येच ते लोपताती । ऐशी होय त्यांची गति ॥११॥
शब्दांचाही शब्द तूंच । स्वरुपभूत तूंच साच ॥१२॥
किरण जैसे सूर्यांतूनी । विस्फ़ुलिंगे अग्नितूनी ण॥१३॥
तेंवि शब्दां शब्दपणे । तुझे पासुनी प्रसवणे ॥१४॥
इतर विषयी प्रकाशला । समर्थ शब्द आहे भला ॥१५॥
परी तुझ्या प्रकाशना । व्यर्थ आहे शब्द-वल्गना ॥१६॥
परी कृतज्ञता भाव । प्रगट होय शब्दांपासाव ॥१७॥
म्हणुनी शब्द बोलत मी । शब्दें तूज वर्णितो मी ॥१८॥
आळवीतो तुजला मी । तुझे आहे निरंतरी ॥२०॥
विनायका साहायभूत । सदा होसी अवधूत ॥२१॥
==
’प्रेम आणि देव । यांचा सदा ऐक्यभाव ’
जगामाजी जे का प्रेम । रुप तुझे ते परम ॥१॥
प्रेममय वसतोसी । प्रेमे जग हे धारिसी ॥२॥
प्रेमस्पर्श तुझा सदा । आहे जगा या वरदा ॥३॥
तूंच प्रेम उपजवीसी । प्रेमे जग हे भरिसी ॥४॥
सुवासिक पुष्प जैसे । गन्धे भरीतसे तैसे ॥५॥
जग प्रेमे भरीतोसी । प्रेमाचे तूं व्यवहारीसी ॥६॥
नानारुपें नाना कळा । देसी प्रेमासी स्नेहाळा ॥७॥
एकरुप भिन्न वाटे । प्रियपण अंगी दाटे ॥८॥
सगुणरुप प्रेमा येतो । तुजसम सगुण होतो ॥९॥
जैसे तुझे भक्त देवा । नानारुचि रमामाधवा ॥१०॥
नानारुपे बनवीती । तूझी देवा निजप्रीती ॥११॥
तैशी प्रेमाची रुपडी । भिन्न अनुभव होय ॥१३॥
जैसी तूझी लीला देवा । तैशी प्रेमाची केशवा ॥१४॥
विनायक म्हणे प्रेम । दत्तरुप ते परम ॥१५॥
७८)
भावनामय प्रेम  । प्रियरुप देव ।
प्रेम माउलींचे प्रेम पितयाचे । प्रेम भगिनीचे भावाचेही ॥१॥
प्रेम बाईलीचे प्रेम सोयरीचे । भिन्नची ते साचे भिन्नरुप ॥२॥
प्रेम तनयाचे प्रेम दुहितेचे । प्रेम अर्भकाचे भिन्नरुप ॥३॥
प्रेम संपत्तीचे प्रेम विषयांचे । प्रेम जे स्वार्थाचे भिन्नरुप ॥४॥
प्रेम ममत्वाचे प्रेम अभिमानाचे । प्रेम जे दंभाचे भिन्नरुप ॥५॥
भावनेचा देव जैसा या जगती । प्रेम ही निश्चिती भावनेचे ॥६॥
भावनामय प्रेम प्रियरुप देव । जैसा ज्याचा भाव तैसा पावे ॥७॥
विनायक म्हणे जे का शुद्ध प्रेम । रुप ते परम दत्तजीचे ॥८॥
==
प्रेम आणि देव । यांचा सदा ऐक्यभाव ।
प्रेमासम दत्त नटोनी येईल । भेटीसी देईल जैसे प्रेम ॥१॥
जे का आरोपिती पितरांचे प्रेम । आईबाप परम तयां होतो ॥२॥
ज्या ज्या भावनेचे जैसे जैसे प्रेम । तैसा प्रेमधाम नटतसे ॥३॥
भावनेसम देतो अनुभव जीवा । म्हणोनि शुद्धभावा आरोपावे ॥४॥
शुद्धभावे भजा तया प्रेमळासी । प्रिय अनुभवासी अनुभवा ॥५॥
विनायक म्हणे प्रेम आणि देव । यांचा ऐक्यभाव सदा असे ॥६॥
==
प्रेम आणि देव । यांचा सदा ऐक्यभाव ।

नामेरुपे भिन्न गमती । भिन्नजगा जाणवती ॥१॥
परि ते एकरुप असती । प्रेम आणि देव निश्चिती ॥२॥
म्हणोनि प्रियरुप आत्मा । बनलासे जगदात्मा ॥३॥
प्रियपण अनुभवा । सदा येत असे जीवा ॥४॥
जीवाशिवा सख्य मोठे । नाही अंतर ते कोठे ॥५॥
एकमेकां सांभाळीती । कधी न कोणा विसंबिती ॥६॥
अशनी शयनी सर्वाठायी । कधि न त्यांची तुटी होई ॥७॥
प्रेम ऐसे विलक्षण । जीवशिवां असे जाण ॥८॥
एक विषय भोगितो । एक निराहार राहतो ॥९॥
परी दुज्यासाठी जपतो । त्याचा अर्थ पुरवीतो ॥१०॥
ऐसे नाते देवापाशी । आम्हां आहे सविशेषी ॥११॥
जड भारी आम्हां होतां । स्वये धरी प्रगटता ॥१२॥
निवारण करी आपण । प्रेममय नारायण ॥१३॥
निमित्त दुजे पुढे करी । निराळा राहे निरंतरी ॥१४॥
कर्तृत्व परी सर्व त्याचे । तया जाणावे देवाचे ॥१५॥
जाणोनियां प्रेम-पूर्ण । होवोनि धरावे चरण ॥१६॥
महिवरुनी कंठ यावा । पुलक अंगी उभारावा ॥१७॥
नयनि बाष्पपूर लोटावा । शब्द तुमचा पालटावा ॥१८॥
कृतज्ञता भरुनि यावी । तनु तुमची कांपावी ॥१९॥
प्रियपणे प्रियरुप । सांठवावे ह्रदी रुप ॥२०॥
विनायक म्हणे सुख । प्रेमापाशी सदा हरिख ॥२१॥
==
ये यथा मां प्रपद्यन्ते

(प्रवचनांत केलेले अभंग )
भावनेचा देव तैसा प्रगटतो । अनुभव देतो तैशापरी ॥१॥
शुद्ध भावनेसी भुकेला ईश्वर । मग सारासार न पाहतो ॥२॥
जेथे नाही शुद्ध भावना प्रमाण । तेथे नारायण तैसा होतो ॥३॥
अशुद्धां अशुद्ध शुद्धांसी तो शुद्ध । भावनेने बद्ध परमेश्वर ॥४॥
भावनेच्यासम घडे साक्षात्कार । तरी हा विचार विचारावा ॥५॥
विनायक म्हणे माझा देवदत्त । धरि प्रियभाव मजवरी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP