मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ?

श्रीदत्त भजन गाथा - शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ?

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


काया वाचा मने परार्थ साधितो । आपणां विसरतो परकार्यी ॥१॥
आपणांसी श्रेष्ठ देव तया मानी । स्वये यश वानी त्यांचे देव ॥२॥
किती प्रेमा सांगूं तया सदाशिवा । जटेत दे ठावा गंगेलागी ॥३॥
सोडीना तेथोनी प्रेमा आवरेना । मांडीत नर्तना शिरी घेवोनी ॥४॥
वाट पहाती जन मातोश्री येईना । दृष्टीस पडेना गुप्त झाली ॥५॥
तल्लीन शंकर नाचत राहिले । गिरिजे भोसले अनुपम ॥६॥
दूर होय उमा पाही शिवाकडे । तवं दृष्टी जडे जटेपाशी ॥७॥
जटेत चमक दिसत स्त्रियेची । छटा मत्सराची आली तिज ॥८॥
माते माते गंगे येई लवकरी । विश्व हांका मारी आर्तस्वरे ॥९॥
हांक पडत ती उमेचिया कानी । येई समजोनी तिजलागी ॥१०॥
भावेची हे कन्या पतिसी प्रिय झाली । मस्तकी घेतली समजले ॥११॥
खिन्न होत उमा नाते जाणवित । गंगेसी बोधित निजबुद्धी ॥१२॥
गंगेलागी घाई अवतरण्याची । मर्यादा जटेची सापडेना ॥१३॥
आर्तरव कानी पडती जनांचे । कळवळले साचे मन तीचे ॥१४॥
शंकराचा प्रेम-भर ओसरला । मार्ग गवसला गंगेलागी ॥१५॥
उमेसी प्रार्थित विश्वाच्या कारणा । माझ्या अवतरणा साधी माते ॥१६॥
परिसोनी गंगा-वच ते लाजली । गिरिजा खोंचली ह्रदयांत ॥१७॥
उमजली मनी समजे योग्यता । आपणां श्रेष्ठता गंगेचीच ॥१८॥
दोघीही प्रार्थना करिती शंकराची । आपुलिया वाची आळवीत ॥१९॥
जागे सदाशिव मनी घाबरले । उमेसाठी भले गिरिपती ॥२०॥
मग वाट देती गंगेसी काढोनी । उत्तरे स्वर्गातूनी महीवरी ॥२१॥
विनायक म्हणे करा गंगोग्सव । तेणे सदाशिव तुष्ट होय ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP