मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
विरक्तीची व्याख्या

श्रीदत्त भजन गाथा - विरक्तीची व्याख्या

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ५/१२/२९
विरक्त असावे नित्य या संसारी । मने निरंतरी सावधान ॥१॥
चळूं न द्यावे मन विषय त्यागावे । मुळी न मोहावे मायाजाळी ॥२॥
प्रापंच लटिका जैसे मृगजळ । विवेकाचे बळ असो द्यावे ॥३॥
क्षोभ न गुंतावे स्वतंत्र असावे । चित्त हे ठेवावे दत्त पायी ॥५॥
पुत्रमित्र बन्धु भार्या जी प्रेमाची । अबधी दत्ताची कल्पावी ती ॥६॥
गृहधन सारे कल्पावे दत्ताचें । आसक्त न व्हावे कोठेही त्वां ॥७॥
मन हे जिंकावे अंतरी विरावे । समरस व्हावे दत्तरुपी ॥८॥
दत्तासी भजावे दत्तासी स्मरावे । सेवापर व्हावे दत्ताठायी ॥९॥
जिव्हेवरी जप ठेवावा दत्ताचा । करावा नामाचा जयजयकार ॥१०॥
दत्तचरित्र गावे प्रेमे परिसावे । रंगोनियां जावे रसामृती ॥११॥
दत्तरुप व्हावे भान विसरावे । दुजेपण जावे लटिके जे ॥१२॥
ठेवूं नये मुळी देहाचाहि लोभ । अनसूयागर्भ आश्रयावा ॥१३॥
भजनपूजन कीर्तन तयाचे । याच व्यासंगाचे दास व्हावे ॥१४॥
नको छंद तुज मना रे दुसरा । होई निलाजरा भजनांत ॥१५॥
गात रहा सदा कथानुसंधान । अखंड भजन करित जा ॥१६॥
विनायक म्हणे हाच उपदेश । जोडी जगदीश याच मार्गे ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP