मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
देव आणि भक्त यांचा रंग

श्रीदत्त भजन गाथा - देव आणि भक्त यांचा रंग

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.

गुरुवार तां ८-५-१९३०

कौतुक मुलाचे कोण करणार । मायेवीण साचार जगती या ॥१॥
पितर शिकविती शब्द बोलायासी । प्रेमे उच्चारासी ऐकताती ॥२॥
बोबडया शब्दांचे नवल करिती । प्रीति पावताती निजठायी ॥३॥
तयांचे ते सुख तयांसीच ठावे । इतरा काय व्हावे त्यांचे ज्ञान ॥४॥
पितरी चोजवितां बालक सुखावे । काय अनुभवावे इतरांनी ॥५॥
तैसे माझे अंगी गुण उपजवीले । कौतुक ते भले सांग कोणा ॥६॥
मजसी जे दिली संपन्नता तुवां । जाणसि माधवा तूंच एक ॥७॥
तेणे सुखावसी कौतुक करिसी । मज चोजविसी परोपरी ॥८॥
परस्परां ऐसा जो सुखानुभव । तयाचे वैभव कोण जाणे ॥९॥
सापत्न भावाने जग हे पाहत । पहाणे विकृत तयाचे की ॥१०॥
तया जगापुढे कशास बोलावे । कशास दावावे संपन्नत्व ॥११॥
तुजवीण नाही कौतुक करणारा । मजसी दुसरा द्त्तात्रेया ॥१२॥
म्हणोनि जे का गुण तुवां मज दिले । सेवेसी ते भले लावणे की ॥१३॥
तुझ्या सेवेसाठी गुणांचा आश्रय । करणे दत्तात्रेय मजलागी ॥१४॥
कशासि पहावे इतरांच्या मुखा । तेणे काय हरिखा देखेन मी ॥१५॥
भजन तूझे गातां तूजसि आनंद । डोलसी मुकुंद ऐकतांच ॥१६॥
भजनाचा रंग तूंच भरविसी । येथे नाचविसी रंगासी तूं ॥१७॥
रंग होत आम्हां तुझिया कृपेने । रंगसी तोकाने मजपाशी ॥१८॥
अंगी अंगी माझ्य़ा प्रेमे संचरसी । डुलत रहासी कौतुकाने ॥१९॥
मजपुढे उभा राहोनि गोविंदा । रंगाते वरदा करितोसी ॥२०॥
रंगामध्ये दंग करोनि अभंग । माझे अंतरंग खुलविसी ॥२१॥
माझ्या पुण्याईते तेवि अधिकाराते । माझीया सिद्धीते चोजवीसी ॥२२॥
येत प्रेमभर तुज पुरुषोत्तमा । ह्रदय-विश्रामा अवधूता ॥२३॥
विनायक म्हणे रंग हा दोघांचा । येथे इतरांचा संबंध न ॥२४॥
==
आम्ही दोघे रंग करुं । भजनाचा फ़ेर धरुं ॥१॥
करुं नामाचा उच्चार । करुं तैसा जयजयकार ॥२॥
करुं कथा निरुपण । करुं रस-विवरण ॥३॥
करुं भक्तिची मीमांसा । उपजवूं प्रेमरसा ॥४॥
मूर्त नाचवूं प्रेमाते । माधुरी लावूं डोलायाते ॥५॥
संसारीची जी जी प्रेमे । भारुनि टाकूं तुझ्या कामे ॥६॥
ममत्वाचा अनुबंध । त्याचा तुज लावूं बंध ॥७॥
एकमेकांते गौरवूं । परस्परांते सुखवूं ॥८॥
बहिरा आंधळा जगासी । डोळस श्रोता परि तुजसी ॥९॥
ऐसा भाव धरोनियां । भजनांत रंग करुं या ॥१०॥
करुं अन्योन्य कौतुक करिसी । मज चोजविसी  परोपरी ॥८॥
परस्परां ऐसा जो सुखानुभव । तयाचे वैभव कोण जाणे ॥९॥
सापत्न भावाने जग हे पाहत । पहाणे विकृत तयाचे की ॥१०॥
तया जगापुढे कशास बोलावे । कशास दावावे संपन्नत्व ॥११॥
तुजवीण नाही कौतुक करणारा । मजसी दुसरा दत्तात्रेया ॥१२॥
म्हणुनि जे का गुण तुवां मज दिले । सेवेसी ते भले लावणे की ॥१३॥
तुझ्या सेवेसाठी गुणांचा आश्रय । करणे दत्तात्रेय मजलागी ॥१४॥
कशासि पहावे इतरांच्या मुखा । तेणे काय हरिखा देखेन मी ॥१५॥
भजन तूझे गातां तूजसि आनंद । डोलसी मुकुंद ऐकतांच ॥१६॥
भजनाचा रंग तूंच भरविसी । येथे नाचविसी रंगासी तूं ॥१७॥
रंग होत आम्हां तुझिया कृपेने । रंगासी तोकाने मजपाशी ॥१८॥
अंगी अंगी माझ्या प्रेमे संचरसी । डुलत रहासी कौतुकाने ॥१९॥
मजपुढे उभा राहोनी गोविंदा । रंगाते वरदा करितोसी ॥२०॥
रंगामध्ये दंग करोनि अभंग । माझे अंतरंग खुलविसी ॥२१॥
माझ्या पुण्याईते तेवि अधिकाराते । माझीया सिद्धीते चोजवीसी ॥२२॥
येत प्रेमभर तुज पुरुषोत्तमा । ह्र्दय-विश्रामा अवधुता ॥२३॥
विनायक म्हणे रंग हा दोघांचा । येथे इतरांचा संबंध न ॥२४॥
==
आम्ही दोघे रंग करुं । भजनाचा फ़ेर धरुं ॥१॥
करुं नामाचा उच्चार । करुं तैसा जयजयकार ॥२॥
करुं कथा निरुपण । करुं रस-विवरण ॥३॥
करुं भक्तिची मीमांसा । उपजवूं प्रेमरसा ॥४॥
मूर्त नाचवूं प्रेमाते । माधुरी लावूं डोलायाते ॥५॥
संसारीची जी जी प्रेमे । भारुनि टाकूं तुझ्या कामे ॥६॥
ममत्वाचा अनुबंध । त्याचा तुज लावूं बंध ॥७॥
एकमेकांते गौरवूं । परस्परांते सुखवूं ॥८॥
बहिरा आंधळा जगासी । डोळस श्रोता परी तुजसी ॥९॥
ऐसा भाव धरोनियां । भजनांत रंग करुं या ॥१०॥
करुं अन्योन्य कौतुक । इतरांसी पाहूं ठक ॥११॥
विनायकाचा विवेक । देव आणि आपण एक ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP