मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
स्वरुपवर्णन

श्रीदत्त भजन गाथा - स्वरुपवर्णन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सुहास्य वदन चतुर्भुज देव । सदा कृपाभाव दृष्टीमधी ॥१॥
अमृत स्त्रवतो कृपेचे दृष्टीने । कृपेचेच लेणे सदा त्याचे ॥२॥
पीतांबरधारी वनमाळा गळां । वैजयंती माळा शोभा देत ॥३॥
किती कोमल हा किती हा सुखाचा । निधी अमृताचा सुधामय ॥४॥
सुधाच केवळ मूर्तत्वे नटली । देवकाया भली तैशी वाटे ॥५॥
मधुर पाहणे मधुर हांसणे । मधुर क्रीडणें दत्तजीचे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP