मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
क्रीडा लालसा

श्रीदत्त भजन गाथा - क्रीडा लालसा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


प्रेमरंग खेळूं या की । मज देवा भेट दे की ॥१॥
तुज बाळ मुकुंदाला । बोलावितों खेळायाला ॥२॥
हमामा हुंवरु घालूं । मातीमध्ये प्रेमे लोळूं ॥३॥
एकमेकां कुस्ती घेऊ । नदीतीरालागी जाऊ ॥४॥
जलावगाहनाते करु । वाळू माजी देह भरुं ॥५॥
चढूं या की वृक्षावरी । झोके घेऊ फ़ांदीवरी ॥६॥
प्रेमे मुखे ओव्या गाऊं । आनंद हा अनुपमुं ॥८॥
विनायका खेळगडी । तूंच प्रेमाचा सोंगडी ॥९॥


References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP