मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
गजेंद्र मोक्ष

श्रीदत्त भजन गाथा - गजेंद्र मोक्ष

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


(प्रवचनांत केलेले )
गजेंद्र मोक्ष
हांक कानी ऐशी देवाच्या पडतां । किती आली द्रवता वर्णू काय ॥१॥
कळवळे देव तांतडी निघाले । सोडवाया भले गजेंद्रासी ॥२॥
गरुड तोही मागें ठेविला देवांनी । आपण धांवोनी स्वये आले ॥३॥
उडीच घातली तेव्हा तया स्थानी । देव प्रगटपणी प्राप्त झाले ॥४॥
शंख चक्र गदा पद्म असे हाती । प्रगट श्रीपति झाले तेथे ॥५॥
प्रेरोनियां चक्र फ़ाडिला मकर । ऐसा करिवर सोडविल ॥६॥
विनायक म्हणे नाहीच उपमा । तया पुरुषोत्तमा ब्रह्मांडांत ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP