मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
विनायकाची गुरुमयता

श्रीदत्त भजन गाथा - विनायकाची गुरुमयता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुसंगे आम्हां जाणे । नित्य गुरुसीं सेवणे ॥१॥
गुरुसेवा हाच धर्म । गुरुसेवा हेच कर्म ॥२॥
गुरुसेवा उपासना । हेच व्रताचार नाना ॥३॥
गुरुसेवा सर्व कांही । आम्हांलागी असे पाही ॥४॥
तन्मय होणे गुरुपायी । लोळण घेणे गुरुपायी ॥५॥
गुरुपायांची विभूति । तीच आम्हां सर्व भूति ॥६॥
गुरुचरणींचे तीर्थ । तोच आम्हां परमार्थ ॥७॥
भजनाचा सांप्रदाय । तोच आम्हां मोक्ष होय ॥८॥
गुरुकीर्तन करणे । गुरुकथा प्रेमे गाणे ॥९॥
गुणानुवादासी वर्णणे । गुरुनाम मुखी घेणे ॥१०॥
गुरुध्यायी मग्न होणे । गुरुमय होवोनी रहाणे ॥११॥
हाच आम्हां असे धंदा । कोणी वंदा किंवा निंदा ॥१२॥
गुरु पुढे आम्ही पाठी । जातो गुरुकार्यासाठी ॥१३॥
दुजा नाही आम्हां हेतु । गुरुभजनी हुतुतू ॥१४॥
देव नेती आम्हां संगे । वंदूं कृपा अनुरागे ॥१५॥
पुढे पाठी देव सदा । काय म्हणावे वरदा ॥१६॥
पुढे अहे मागे आहे । कृपादृष्टी आम्हां पाहे ॥१७॥
देव प्रेमाचा सागर । देव सुखाचे आगर ॥१८॥
आम्ही जातो देवसंगे । भरलो आम्ही अनुरागे ॥१॥
अवघाच देव आम्हां । आम्ही न जाणो अन्य कामा ॥२॥
विनायक गुरुमय । तया जग गुरु होय ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP