मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
’अहं दत्तोऽस्मि’

श्रीदत्त भजन गाथा - ’अहं दत्तोऽस्मि’

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २०-११-१९३०

माझ्या मुखे बोले माझ्या दृष्टी पाहे । अंतरी स्फ़ुरताहे माझ्या सदा ॥१॥
संकल्प तयाचा करणी तयाची । सिद्धता ही साची त्याची असे ॥२॥
पूर्ण संचरला असे माझ्याठायी । माझीया ह्रदयी अधिवसे ॥३॥
लोकांपुढे दृश्य ठेवाया कारण । सकळ आपण पुरवितो ॥४॥
येथे काय माझे सकळ देवाचे । अधिष्ठान त्याचे सर्व कांही ॥५॥
विनायक म्हणे मी तो वासुदेव । माझ्या ठायी भाव असे त्याचा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP