मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
स्वरुपवर्णन

श्रीदत्त भजन गाथा - स्वरुपवर्णन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २५-७-१९२९
दंड कमंडलु शूळ करी शोभे । चंद्राचे प्रतिभेसम मूर्ति ॥१॥
सुहास्य-वदन सुधापूर्ण नेत्र । दर्शन परत्र गति-दाई ॥२॥
मृदुल हे तनु किती सुमधुर । अमृताचे सार एकवटले ॥३॥
मधुर हे कांति मधुर हे स्मित । तेज हे फ़ांकत सौम्यतेचे३ ॥४॥
तेजाचा हा गाभा तेजेचि बनला । आनंद तो मला देत किती ॥५॥
पिऊं काय खाऊं चाटुं हे सुमूति । मनामाजी तृप्ति स्समायेना ॥६॥
सुकुमार किती नाजुक साजुक । मजसीं रुपक सुचेनाचि ॥७॥
आनंदाचा भर अजुनि माझ्या मना । पारणे नयना आज झाले ॥८॥
तोषलों बहुत तृप्ति मी पावलो । सुखाने जाहलों बेहोष की ॥९॥
विनायक म्हणे मति विकासली । कळी हे फ़ुलली ह्रदयाची ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP