मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला

श्रीदत्त भजन गाथा - ’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


अक्षय ३ गुरुवार ता. १-५-१९३०

हेतु विशद केला निजमंत्राचा त्वां । माझीया ममत्वा जाणवाया ॥१॥
देहासक्ती जावी शांति प्राप्त व्हावी । निरोगता व्हावी मजलागी ॥२॥
अहं दत्तोऽस्मीति मज जपविले । मज ओळखविले निजरुप ॥३॥
चार महावाक्ये त्यांचा अनुभव । वैराग्य वैभव जाणवीले ॥४॥
तत्वमस्यादि जे लक्षत्व वर्णिले । अवधुती भले व्याख्यायिले ॥५॥
निजस्वरुप ते मज जाणविले । मज साक्षात्कारीले ब्रह्मज्ञान ॥६॥
"देहव्यथेने तूं त्रस्त कैसा होसी । कां न विसरसी देहनिष्ठा ॥७॥
माझे पूजेमधी स्मरण देहाचे । कैसे तुज साचे रहातसे ॥८॥
परि-पक्कपण तुजला यावया । चांचल्य जावया स्वभावाचे ॥९॥
अहं दत्तोऽस्मीति स्मरणी दिधली । दत्तोहमिती भली जाणवाया ॥१०॥
मन्त्रनिरुपण मज कळविले । आशये सांगितले वैराग्याच्या ॥११॥
"अर्धाकच्चा कैसा रहिलासी मुला । माझा नाद भला लागल्याही ॥१२॥
पक्कपण यावे न कोणा भ्यावे । दत्तात्मा असावे सर्वकाळ ॥१३॥
विनायक म्हणे उपदेश केला । गुरुराया भला कळले मज ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP