मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
ईश्वराचे विनायकास सहाय्य

श्रीदत्त भजन गाथा - ईश्वराचे विनायकास सहाय्य

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सांगावे हे नाथा कोणी कृत्य केले । तुजवीण भले वासुदेवा ॥१॥
कोणी माझा देह निरामय केला । कोणी प्रसन्नतेला मज दिले ॥२॥
कोणी दिली मज सद्गुरुची काठी । धैर्यवृत्ति गोमटी कोणी दिली ॥३॥
कोणी मज केले बेहोष कार्यांत । कोणी मज निश्चित ठेवियेले ॥४॥
अहोरात्र सेवा कोणी करविली । साधने जमविली कोणी सांग ॥५॥
कोणी शिजविले अन्न या कार्यांत । कोण राहिले गात आनंदाने ॥६॥
कोणी वाजविले कोणी बा गाईले । पुष्पाते आणिले कोणी सांग ॥७॥
कोणी बिल्वपत्र येथे बा आणिले । कोणी सांग केले सिद्धतेला ॥८॥
कोणी सांग येथे चंदन उगाळिले । शिरासि वाहिले पाणी कोणी ॥९॥
कोण सांग येथे कार्यांत खपले । शिरावरी घेतले कोणी सांग ॥१०॥
कोणी याची चिंता वाहिली ती सांग । कोणी केला रंग कार्यात या ॥११॥
तूंच सर्व केले मनने घेतले । मजला पेटले पुरुषोत्तमा ॥१२॥
विनायक म्हणे माझे हे वैभव । श्रीगुरुवासुदेव नित्य राख ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP