मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
ईशप्रसाद लक्षणें

श्रीदत्त भजन गाथा - ईशप्रसाद लक्षणें

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता.१८-७-१९२९
प्रसादाचे असे लक्षण बरवे । आपुल्या वैभवे प्रकाशावे ॥१॥
आपणाठाय़ींच निमग्न असावे । आपण रमवावे सर्व कांही ॥२॥
डुलत असावे आपणाठायीच । सक्ळ तृप्तिच उपभोगाया ॥३॥
आपणे आपणा पहात रहावे । एकरुप व्हावे पहातां पहातां ॥४॥
पहाणे पण पहाणे सकळ जगाचे । सकळ-दृष्टीचे पारणे की ॥५॥
मनामाजी मन मुरोनि रहात । सकळ प्रसाद्त वृत्ति त्याची ॥६॥
त्रिभुवनामाजी होय मिसळण । प्रसादाची खूण हीच जाणा ॥७॥
सुखदु:ख तेणे मिळोनियां जाते । शांतीचे पडते आवरण ॥८॥
त्रिविधतापाचे येथे नाम नाही । संतोषचि पाही अवघा तो ॥९॥
विनायक म्हणे मजसी प्रसाद । करित वरद वासुदेव ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP