मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा| गुरु माउली श्रीदत्त भजन गाथा गणेश जयंती शिवरात्र राम नवमी हनुमान जयंती. नृसिंह जयंती वासुदेव-जयंती कृष्णजयंती वराह जयंती वामन जयंती देवी चरित्र गुरुद्वादशी भाऊबीज सप्ताह-अनुष्ठान उत्सवाची मागणी उत्सव चंपाषष्ठी वासुदेव चरित्रसार दर्शनसुख अहं दत्तोऽस्मि ईशप्रसाद लक्षणें स्वरुपवर्णन दर्शनलालसा क्रीडा लालसा दत्तदासांची श्रीमंती दत्तभक्ताची स्थिति वासुदेव चरित्र सार वासुदेवाचा धांवा श्राद्धविधी उत्तरगति कोजागरी योग्याची लक्षणे नरकासुर वध श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध स्वरुपवर्णन सदा वस देवा ठायी योगाभ्यास विष्णुप्रबोध सह्यवनश्री व देवांचा विलास विरक्तीची व्याख्या कृतज्ञता वचन प्रार्थना स्वरुपवर्णन भजनछंद गजेंद्र मोक्ष ये यथा मां प्रपद्यन्ते ईश्वरावर निस्सीम निष्ठा दर्शन लालसा सत्यापरता नाही धर्म नृसिंह्सरस्वती प्रयाण भिल्लीणी आख्यान कृतज्ञता वचन ईश्वराचे विनायकास सहाय्य गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग दत्तमयत्रिभुवन तमाशा ईश्वर आणि भक्त विनायकाचा संकल्प भक्ताभिमानी देव भीष्म प्रतिज्ञा ईश्वराची भक्तांशी ऐक्यता ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना विश्वामित्र मख रक्षण भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती देवकार्यासाठी धैर्य पाहिजे देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत कनवाळू देव कनवाळू देव दृष्टांत प्रभुवात्सल्य परमेश्वराची शब्दातीतता शबरी आख्यान ’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला दत्त भार्गव भेट दत्त तादात्म्य देव आणि भक्त यांचा रंग देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति वसंतश्री देवांचा वसंत महोत्सव रमामाधव योग गंगावतरण शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ? गंगावतरण एको रस: करुण एव देवलीलांचे अगम्यत्व व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा ) वासुदेव चरित्र सार विनायकाचे कोडे दु:ख स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह: गुरु माउली कृपाळू वासुदेव "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" ईशसेवनासक्ती जगत्पिता पितृत्वाचे कारण अन्न उपासनामहती योगाचा दुरुपयोग कर्माने मोक्ष मिळत नाही शुंभ-निशुंभ कथा स्खलनशीलता मन हे ओढाळ गुरुं देहप्रमाद उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर भगवंतास स्वार्पण भक्तत्राता परमेश्वर ’अहं दत्तोऽस्मि’ बालस्वरुप वर्णन भक्त आणि देव यांची एकरुपता आज्ञा विनायकाचा अनुभव विनायकाची गुरुमयता श्रीगुरुंचा आशीर्वाद श्रीगुरुंचा निरोप श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन प्रस्थानकाळी आज्ञा मागणी श्रीदत्त भजन गाथा - गुरु माउली श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन गुरु माउली Translation - भाषांतर गुरुवार ता. ७-८-१९३०गुरुवांचोनियां कोठे नाही थारा । म्हणोनी निर्धारा अर्पावे त्या ॥१॥क्षमावान गुरु कधी न कोपती । दयाच करिती निजदासा ॥२॥कृपेची ती मूर्ति सद्गुरु माउली । तिची असे ओली पाखर की ॥३॥प्रेमामृत आहे सदा तिजपाशी । तिस उपमेसीं वस्तु नाही ।\४॥रक्षित भक्तांसी शासित दुष्टांसी । वाढवी भक्तीसी भजनास ॥५॥कृपेने द्रवत उडीच घालित । भक्तांसी तारित गुरुमाता ॥६॥विनायकासी ती कधी न पाठमोरी । सन्मुख साचारी कृपापूर्ण ॥८॥==गुरुमाउलीचा कृपा भावकितीतरी प्रेम भरिले ह्र्दयांत । कृपा पहा सांडत अनिवार ॥१॥कृपेने भरली कृपेची बनली । कृपामूर्ति भली गुरुमाय ॥२॥माता काय निज लाथाडील बाळा । काय कळवळा तिज नाही ॥३॥काय होईल ती कठीण माउली । ऐशी माता भली बोलूं कैशी ॥४॥जरी मी बोलिलो कठोर ही माता । मज सह्र्दयता नसे काय ॥५॥कृतघ्न मी काय निंदूं या मातेला । माझीया पापाला जोड कोठे ॥६॥जिने आजवरी मजसी तारिले । मजसाठी केले धांवण्यांते ॥७॥तिस काय म्हणूं निष्ठूर कठोर । पागल अंतर काय माझे ॥८॥माझ्या पाठीमागे कृपेने ती उभी । मेघ जेवि नभी ओळली ते ॥९॥मजवरी वर्षी कृपामृतधारा । कृपेचा पहारा तिचा असे ॥१०॥शत्रु माझे सर्व दूर करी माता । मज निर्विघ्नता सदा ठेवी ॥११॥जेथे जाईन मी तेथे मज संगे । येत अनुरागे प्रेमाचीया ॥१२॥रुसलो मी जरी मज समजावीत । मज चुचकारीत माझी माता ॥१३॥अनुभव मज ऐसा हा दासाचा । किती माझी वाचा सांगेल की ॥१४॥मज विसंबेना क्षण एक माय । सांद्र तिचे ह्रदय प्रेममय ॥१५॥विनायक म्हणे तिज काय वानूं । थोडके वर्णनू पडे सारे ॥१६॥==गुरुमाउलीचा लटिका कोपअल्प धैर्य पाहे सत्वर धांवताहे । मज प्रगटताहे लवलाही ॥१॥क्षण एक दावी मज जडभारी । कष्ट जो अंतरी होती माझ्य़ा ॥२॥तवं ती उडी घाली संकट निवारी । काय प्रेमा सरी तिचीया हो ॥३॥धन्य गुरुमाता धन्य तिची ममता । सर्वचि धन्यता तिचेपाशी ॥४॥वधोनियां दुष्ट वारोनी संकट । उभी राहे निकट निमूट ती ॥५॥समजुं न देता पहात गंमत । जो जो आळवित दीनवाणा ॥६॥क्षणभरी ऐसे वाटायासी देई । माय ही न येई धांवोनिया ॥७॥निष्ठूर हे झाली मजसी पावेना । वाटवीत मना किंचित्काल ॥८॥तव कळोनियां येत मग मात । अहित उध्वस्त जाहले की ॥९॥दूरच्या दूर ती संकटे पळाली । दावीत माउली चमत्कार ॥१०॥ऐसा मज किती अनुभव आला । मज सांगण्याला शक्ति कैची ॥११॥विनायक झाला बहु सद्गदित । चरण घरीत लीनपणे ॥१२॥==गुरुमाउलीचा लटिका कोपखोटाच की कोप दावी क्षणभरी । भिववी अंतरी आम्हांलागी ॥१॥क्षणभरी वाटे आधार तुटला । मज गरिबाला कोण रक्षी ॥२॥कोण माझा वाली आतां या जगती । ऐसे मनाप्रति वाटूं लागे ॥३॥कौतुक मायेचे काय मी बोलावे । अनुभवा यावे दयाळुत्वे ॥४॥क्षणांत तो कोप मावळोनि गेला । सिद्ध उचलायाला क्षणामाजी ॥५॥पसरोनी पट घेत की झांकोनी । बहु कुरवाळोनी मृदु बोले ॥६॥तुझे झाले कार्य भिऊ नको आतां । ईडा पीडा अहितां प्राप्त होय ॥७॥तुझे वैर्यांवरी कोप मी प्रेरिला । त्यांच्या दहनाला करील तो ॥८॥तुझी हानि मृत्यु तुझिया वैर्यांसी । माझीया कोपसी प्राप्त होय ॥९॥ऐसे सांगे माता बहु कुरवाळी । पूर्ण आतुर्बळी समर्थ जी ॥१०॥मज अनुभव असे वारंवार । तोच मी साचार बोलतसे ॥११॥माझा आहे थोर विश्वास मायेसी । रक्षील मजसी वात्सल्याने ॥१२॥तिचीया पायांसी मिठी मी घातली । तिजला अर्पिली चित्तवृत्ती ॥१३॥येवढेच माझे कार्य असे जाणा । तिचीये चरणा नम्र होणे ॥१४॥विनायक म्हणे वत्स माउलीचा । पदर धरी तिचा कृपेसाठी ॥१५॥==धांवाआतां कृपा करी संकट निवारी । वैरीयां संहारी माउली गे ॥१॥टपत बसले जे कां माझे वैरी । तयांसी तूं मारी जननी गे ॥२॥जन्मापासोनियां देवा एक केले । तुझे भजन भले प्रेमभरे ॥३॥तेच आतां येवो मजसी फ़ळाला । माझे रक्षणाला करो नाथा ॥४॥जो का तुझा कोप योजी तो वैर्यांसी । माझ्या आप्तेष्टांसी सुखी करी ॥५॥अभिमान राखी आपुल्या वत्साचा । आपुल्या स्थानाचा राखी माये ॥६॥आपुल्या भक्तीचा आपुल्या सेवेचा । अभिमान साचा राखी माये ॥७॥अभिमान राख कृपानुग्रहाचा । जो का केला साचा मजवरी ॥८॥जे का वदविले तुवां माझ्या मुखे । अभिमान राखे तयाचा तूं ॥९॥निर्वाणीचे माझे असे हे बोलणे । देवा पुरविणे इच्छा माझी ॥१०॥आम्ही कोठे जावे कोणासी सांगावे । कोणा विनवावे दीनवाणे ॥११॥असोनियां तुझे आम्ही कां इतरां । सहाय उदारा मागावे की ॥१२॥आम्ही तुझे दास प्रार्थू कां इतरा । सामर्थ्य उदारा न का तुज ॥१३॥विनायक म्हणे मजसी तारावे । मजसी पावावे गुरुनाथा ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP