मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
प्रभुवात्सल्य

श्रीदत्त भजन गाथा - प्रभुवात्सल्य

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २४-४-१९३०
मंत्र मज दिला व्याधि निरसना । तुवां दयाघना कृपाळुत्वे ॥१॥
तेणे झाले व्याधि शमन तात्काळ । किती तूं स्नेहाळ मजवरी ॥२॥
मायेसम माझ्या पुढती तूं उभा । अगा पद्मनाभा राहिलासी ॥३।
सांगितले मज व्याधि-परित्राण । कृपेचे वीक्षण करोनी त्वां ॥४॥
किती तरी देवा कळवळलासी । तुझीया प्रेमासी सीमा नाही ॥५॥
कोठोनी आलासी कळले न मज । कैसा माझे काज प्रगटलासी ॥६॥
केला साक्षात्कार मनु मज दिला । दास अनुग्रहिला ऐसा तुवां ॥७॥
केवढे हे प्रेम केवढे वात्सल्य । सर्व आनुकूल्य तुझे भक्तां ॥८॥
तुजसम तूंच उपमा तुज नाही । दया मूर्ति पाही केवळ तूं ॥९॥
विनायक काय अधिक बोलेल । देवा तूं अतुल जगत्रयी ॥१०॥


N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP