मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
श्रीगुरुंचा निरोप

श्रीदत्त भजन गाथा - श्रीगुरुंचा निरोप

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


आतां लोभ ठेवा आम्ही आतां येतो । प्रसाद करितो तुम्हांवरी ॥१॥
आपुलाले हित साधाया भजन । करा अनुदिन आज्ञा ऐसी ॥२॥
भजने पूजने साधेलची हित । यास्तव नेमस्त वचन हे ॥३॥
हेच आमुचे की सांगणे तुम्हांला । निज कल्याणाला साधा तुम्ही ॥४॥
जैसे जैसे जो जो आचरेल हित । तैशी कृपा होत आमुची त्या ॥५॥
विनायक म्हणे श्रीगुरुनिरोप । तुम्हां मायबाप कथिला मी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP