मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
वासुदेव चरित्र सार

श्रीदत्त भजन गाथा - वासुदेव चरित्र सार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २२/८/२९
वैराग्याचा निधि स्वामी वासुदेव । आला दत्तदेव प्रत्यक्ष तो ॥१॥
आम्हां उद्धाराया मार्गासी लावाया । धर्म संस्थापाया जगीं आला ॥२॥
कलियुगी थोर अधर्म प्रवृत्ति । कराया निवृत्ति आला असे ॥३॥
आम्हांसाठी तेणे घोर तप केले । देहा कष्टाविले आपुलिया ॥४॥
सदा पायी चाले वाहन न सेवी । नासाग्र दृष्टी ठेवी यतीश्वर ॥५॥
नाही केला कांही संसार जगती । वनला तो यति संन्यासी की ॥६॥
धर्मदंड हाती मुखी असे श्रुति । श्रवणीं असे स्तुति दत्ताचीच ॥७॥
नयनांत मूर्ति अत्रितनयाची । स्थिति ह्रदयाची विनिर्मुक्त ॥८॥
विद्येचा सागर करुणेचे घर । सदा सर्वेश्वर स्वरुपांत ॥९॥
हास्य असे मुखी भाव त्या कृपेचा । ठेवा आनंदाचा जणुं जाणा ॥१०॥
टेंबे कुळाचीही श्रीमंत संतति । व्राह्मणाची युति मूर्त जाणा ॥११॥
आश्रमाचे स्थान व्रतचा विश्वास । पुण्याईचे धाम जगद्गुरु ॥१२॥
पूर्णमुक्त जाणा प्रभूत्तम माधव । विर्तक्ति वैभव अनुपम ॥१३॥
सूर्यासम तेज अग्निसम कांति । सकळ जणुं दीप्ति एकवटली ॥१४॥
सत्यमूर्ति जाणा केवळ ज्ञानरुप । जैसी आईबाप दयावंत ॥१५॥
कोण वानी यश त्या सद्गुरुचे । कोणाच्या की वाचे बळ असे ॥१६॥
विनायक झाला तल्लीन चरणी । स्वामी मोक्षदानी वासुदेव ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP