मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भक्त आणि देव यांची एकरुपता

श्रीदत्त भजन गाथा - भक्त आणि देव यांची एकरुपता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


भक्त आणि देव यांत भेद नाही । पाहूं नये कांही भेद मुळी ॥१॥
पाहिल जो भेद तयासींच भेद । घडेल अभेद जाणावे हे ॥२॥
देवाठायी भक्त भक्ताठायी देव । त्रिभुवन भाव भगवद्भाव ॥३॥
भजतां देवासीं ऐक्यत्व पावत । भगवद्भाव येत लगटोनी ॥४॥
विनायका आहे अमृतानुभव । सदा वसे देव त्याच्यापाशी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP