अभंग
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
॥ अभंग ॥
आम्हा उणे काय सदय आला रामराजा । स्वभक्त समाजा संरक्षी जो ॥१॥
नंदी वाहन प्रिय नंदवी सज्जन । तयासी लक्षीन अंतर्दृष्टी ॥२॥
दरती जयासी दैत्य दर्शने पातकी । मुक्त हे त्रिलोकी स्मरणें ज्याच्या ॥३॥
घनश्याम राम स्वरुपीं घन दाट प्रकाश । मुळीं चिदाकाश जो परमात्मा ॥४॥
नव नव हर्षद नम्र भक्तांतरा । वंदीन सदारा त्या श्रीरामा ॥५॥
राम भक्तांचा कैवारी राक्षसांसी वाघ । जेणें दुष्ट संघ मर्दीयेला ॥६॥
मनामाजी स्फुरवी सुख मज ज्याचें नाव । कळवि आत्म गांव आत्म भक्तां ॥७॥
आनंदघना रामा विष्णू कृष्ण जगन्नाथा । वरदहस्त माथा ठेउनि तारीं ॥८॥
या अभंगात २ वेळा ‘ आनंदघन राम ’ व २ वेळा ‘ जानकीश राघव ’ हे मंत्र आले आहेत.
-----------------------
॥ अभंग ॥
श्री समर्थ वैष्णव सद्गुरु पिता रामराजा । सीता लक्ष्मी भाजा माता माझी ॥१॥
रात्रदिवस करिती मज सुख समुद्रींलीन । प्राण संजीवन जयांवेनी ॥२॥
मज कळवी परमा- र्थ भला विषयिं ठकाठकी । निजात्म विवेकी तोची धन्य ॥३॥
दाशरथी माझी वाहे सर्वही काळजी । साधी भजकांजी इच्छा सिद्धी ॥४॥
सर्वदा सद्भक्ती - युक्तां कळवि आत्म ठाव । प्रभुराम राव त्रैलोक्याचा ॥५॥
माया समुद्र हा तरवी करितां निज ध्यान । स्वात्म सुख ज्ञान फळवी भक्तां ॥६॥
रुपें विश्व सद्रुप नटला शुक्ती चिन्मय सारा । त्रैलोक्य पसारा रामसाचा ॥७॥
तीर्थाचें माहेर यश ज्याचें गोड नाम । होती पूर्ण काम गातां वाचे ॥८॥
रामविष्णू कृष्ण जगन्नाथ सच्चित्सूख ॥ तन्मय सन्मूख मारुति ज्याच्या ॥९॥
या अभंगांत २ वेळा ‘ जानकी जीवन राम ’ १ वेळा ‘ समर्थ आयु तनय ’ व १ वेळा ‘ श्री रामदास मारुती ’ हे मंत्र आले आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP