मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीरामाचें पद

श्रीरामाचें पद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


सच्चित्सुख जगलहरींत स्फुरसि आत्मपणी, तुजविण मज कोणि नावडे चापपाणि । हितगुज माझें तूंचि एक जो अनेक विश्वव्यापक कनकनगापरी । तूं जननि - जनक माझा सनकादिस्तुत प्रभु तूं राघव रामराजा । दिव्य सिंहासनि शोभे यद्वामांकिं जानकि भाजा । द्यान निरंतर करि त्याचें देहभान हरुनि अद्वयात्म सुख स्फुरविसि अंतरीं हें बिज त्वद्भक्ताचि जाणति । अन्य नेणति फुकट शिणति ज्ञानोपायीं । सगुण - निर्गुण भेद नाहीं लवहि कांहीं । अवयव मिथ्या भासति आपण निरवयवालक्ष न लक्षिति खुण सच्चिदानंद स्वरूप जे मुळिंची । तरि ते बुद्धि खुळिच त्यांचि द्वैतभावना निरसलि नाहीं मानसाचि । “ सगुणढोंग ” ह्मणति अद्वय स्थिति कशाची ? चरणिं शरण मी अनन्य । स्वपदभक्तिभाग्यें धन्य करुनि तूंचि कळविसि मज आत्मस्थिति बरी । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ । तुला हात जोडुनि प्रार्थितो मी ऐसें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP