मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
पिंड ब्रह्मांड निवारण

पिंड ब्रह्मांड निवारण

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज


॥ श्रीराम ॥
॥ अथ पिंड ब्रह्मांड निवारण ॥
पिंड ब्रह्मांड स्थूळ जाणा । मथूनि काढितों मी पणा । परी एथें अनुसंधाना । धरूनि असिलें पाहिजे ॥१॥
पांच भूतांचीं ते परी । मुळापासूनि शेवटवरी । तेचि ऐकावी चतुरीं । एकाग्रतें करूनी ॥२॥
पृथ्वी आण आप तेज । वायू आकाश सहज । अकेके भुताचें काज । वर्णितों मीं सावध ॥३॥
रोम त्वचा नाडी मांस । अस्थि जाण पांचवा अंश । यांत कोण आपण असे । विचारूनि पहावें ॥४॥
स्वेद लाळ रक्त रेत । मूत्र पांचवें कळत । आपण तो कोण यांत । विवेकें मी जाणावा ॥५॥
क्षुधा तहान आलस्य निद्रा । रती जाण अग्नी सारा । यांत मी म्हणे कोण खरा । सांग शिष्या सावध ॥६॥
चळण वळण प्रसरण । अकोचन निरोधन । यांत मी मी म्हणतो कोण । विचारूनि सांगावा ॥७॥
कामक्रोध शोक मोह । पांचवें तें जाण भय । हा आकाश पर्याय । यांत मी तो कोण रे ॥८॥
पांच भूतांचे पंचविस । अर्थ कथिले सावकाश । शरण जातां वैष्णवांस । मी मी म्हणतां समजे ॥९॥
माझें ऐसें जे बोलती । तेची आपण कैसी होती । सर्व माझेंचि म्हणती । तेचि कैसा आपण ॥१०॥
इति श्रीलघुआत्ममथने, गुरुशिष्यकथने, स्थूलदेह निवारण प्रथम पद समाप्तः श्रीसीताराम चंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP