श्री संत लक्षणें पदें
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
पद १ लें -
तो तो सुखात्मा करि स्वहित साचें जो ॥धृ०॥
पावतां मनुष्य देह, सांडुनि वैषयिक स्नेह, विसरुनि स्त्री पुत्र गेह, श्री गुरुपदीं रत होउनि स्वरुप मात्र जो ॥तो तो०॥१॥
देखतांचि दृष्य द्वैत, कोण मी हा धरुनि हेत, आपुला आपण शोध घेत, सच्चित्सुख विवरणांसि परम पात्र जो ॥तो तो०॥२॥
विष्णु गुरु पदाब्ज भृंग, कृष्ण सेवितो असंग, चिदानंद मधु अभंग, प्राशित निज हित उमजुनि दिवस आत्र जो ॥तो तो०॥३॥
पद २ रें -
राम हृदय गगन रवि उघड करिल त्या सुजना मी नमीं ॥धृ०॥
बिंब प्रति बिंबातें निवडुनि, ऐक्य विचरें भेद हरिल ॥त्या०॥१॥
नासुनि जगनग अंतर्ज्ञानें, आत्म कनक जो सत्य वरिल ॥त्या०॥२॥
दृष्य भास शब्द सह सांडुनि, अखंड आत्म जो सत्य वरिल ॥त्या०॥३॥
ग्रासुनि मीपण एकचि आपण, चिदानंद परिपूर्ण स्मरिल ॥त्या०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, अखंड अद्वय पथ विवरिल ॥त्या०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP