मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
अथ अधिष्ठाण कथन

अथ अधिष्ठाण कथन

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज


॥ अथ अधिष्ठाण कथन ॥
मी मी ऐसें ह्मणत । परी मी कोण हें नेणत । तेंचि आतां मी सांगत । ऐक शिष्या सावध ॥१॥
स्थूळ देह लिंगदेह । कारण जाण तिजा देह । चौथा महाकारण देह । पिंडीं देह चार हे ॥२॥
ब्रह्मांड हिरण्यगर्भ माया । चौथी जाण मूळ माया । पिंड ब्रह्मांडीं हे काय । मिळूनि झाल्या आठ हीं ॥३॥
चार देहांचा जो साक्षी । त्याची ध्वनी मी मी ऐसी । खुणे जाणावें तयांसी । खूण पुसा वैष्नवां ॥४॥
इति अधिष्ठान निरूपण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP