श्री राघवाष्टक
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
॥ श्री राघवाष्टक ॥
दिला देह त्वां राघवा मानवाचा । धरूनी अभीमान माझ्या जिवाचा ॥
तरी भेटि दे आपुली रामराया । सदा आवडीनें स्वभक्ती कराया ॥१॥
दिले नेत्र त्वां रूप तूझें पहाया । स्वरूपीं तुझ्या स्थीर दृष्टी रहाया ॥
कृपानुपणा काय वर्णू तुझा मी । तरी दखवीं दिव्य जे पाय स्वामी ॥२॥
कधीं भेटसी देसि तूं दर्शनातें । असा लागला वेध माझ्या मनातें ॥
त्वदंशें भवाब्धीस म्यां या तरावें । करूनी कृपा भेटिनें उद्धारावें ॥३॥
दिले हात वंदावया, या करानें । स्वसेवा करीवीच म्यां चाकरानें ॥
असा भरंवसा हा मला ठांस पाहे । पाहूनी तुखा वाट लक्षीन आहें ॥४॥
मना इंद्रियांचा जो अधिष्ठान तो तूं । करीसी सदा पूर्ण जो भक्त हेतू ॥
दत्तासागरा त्या तुला म्यां पहावें । सुखें सुख होवोनि आंगें रहावें ॥५॥
असा हेतु माझा प्रभो राम राजा । करी पूर्ण तूं साधिसी भक्त काजा ॥
तुझ्याविण वाटे उदासीन दीशा । मओला येउनी भेट रे जानकीशा ॥६॥
किति वेळ झाला तुला यावया रे । प्रभो पाहतो प्राण हा जावया रे ॥
उडी घाली या संकटीं राघवा रे । अहंभाव हा ग्रासि तूं अवधा रे ॥७॥
मुखें विष्णु कृष्ण जगन्नाथन नामा । स्मरें सर्वदा मी न राहे रिकामा ॥
तुझ्या दर्शनें सच्चिदानंद रामा । सदा होय आनंद आनंदधामा ॥८॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP