मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री जगदंबेचे अभंग

श्री जगदंबेचे अभंग

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.



जय जगदंबें नवदुर्गे आई । चित्त तुझे पायीं लागों माझें ॥१॥
लागो मज आत्मध्यान निरंतर । न पडो विसर कदा काळीं ॥२॥
कदाकाळीं कांहीं नावडो आणीक । आपणचि एक प्रिय वाटो ॥३॥
प्रिय वाटो मज आत्म भक्ती सदा । संसार आपदा न भोगितां ॥४॥
न भोगितां देह मीपणाचे जाच । आत्म कृपा साच करूनियां ॥५॥
करूनियां माझें नित्य समाधान । दावी अनुसंधान आनंदाचें ॥६॥
आनंद अखंड कृष्ण जगन्नाथ । धरुनी आत्मपथ आंगें घोटी ॥७॥


आत्म कृपा दृष्टी केव्हां करिसी माते । मज अनाथातें आनंदाया ॥१॥
आनंदाचा चित्त दाउनि आत्म हीत । केव्हां हृदयांत सुखविसी ॥२॥
सुखविसिई कदा आत्म बाळकासी । निश्चय मानसीं हाचि माझा ॥३॥
हाचि माझा हेतु पुरविसी कदा । हरुनी आपदा संसाराची ॥४॥
संसारिचा धंदा घाली भवबंधा । लाउनियां छंदा विषयांच्या ॥५॥
विषयांचा सोस देतो गर्भवास । पुरे पुरे त्रास वर्णवेना ॥६॥
वर्णवेना आहें आत्म धैर्यावरी । धांव झडकरीं जगदंबे ॥७॥
जगदंबे कदा आत्म भेटी देसी । अंकावरी घेसी प्रेमें कदा ॥८॥
प्रेमें कदा विष्णु कृष्ण जगन्नाथा । लाविसी गुणगाथा ॥९॥


रात्र दिवस तुझें करिती जे ध्यान । तयांचा अभिमान धरिसि आंगें ॥१॥
आंगें भजे त्यांच्या संगें तूं अससी । अखंड जागसी हृदयीं सदां ॥२॥
सदा सर्वकाळ तुझें नाम गाती । त्याची पक्षपाती वधिसी दुष्टां ॥३॥
वधिसि दुष्टां हे तों पुराणीं ऐकिलें । म्हणुनी हाकीलें धांव वेगीं ॥४॥
धांव वेगीं माझे जगदंबे आई । पहासी तूं काई अंत माझ्या ॥५॥
अंत माझा पाहूं नको नवदुर्गें । दुष्टांच्या संसर्गे मळलों भारीं ॥६॥
मळलोंसे भारीं कळविलें तूज । नको पाहूं चोज येईं येईं ॥७॥
येईं येईं वेगीं धांऊनिया माते । जोडीलिया हातें विनवीतों ॥८॥
विनवितो कृष्ण जगन्नाथ भावें । आत्म दर्शन व्हावें सदोदीत ॥९॥


गंगा यमुना हो सांगतसें ऐका । कधीं सोडूं नका एकांतातें ॥१॥
बैसुनी एकांतीं विचार करावा । शोध बरा घ्यावा आप आपणा ॥२॥
जें जें डोळां दीसे तें तें सर्व नासे । सदोदित असे आपणची ॥३॥
उठल्या वृत्तीचा आपण तो साक्षी जाणोनियां रक्षीं साधन हो ॥४॥
आपण तों एक वृत्ती त्या अनेक । वृत्तींचा कलंक मज नाहीं ॥५॥
मज पुढें वृत्ती मी आहे त्या पाठीं । विचार हा पोटीं दृढ धरा ॥६॥
दृढ धरा साक्षी कल्पना उठतां । आपणा जाणतां समाधान ॥७॥
समाधानासाठीं सेवावा एकांत । ग्रंथ परमामृत विवरावा ॥८॥
विवरावें संत साधूंचें वचन । कृष्ण पदीं लीन विष्णू कृपें ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP