मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
गवळण काल्यांतील पदें

गवळण काल्यांतील पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


एक बोबड्या गोपाल कृष्णाप्रत बोलतो -
पद १ लें -
तिथ्ना बलि मथलत् तलिथी थुंदलत लितीले ॥धृ०॥
दाद्लत दोपी अथति दली । तोली तलिथिल तो नपली । दलबल पलिथुनि थतल हली । धलिति तली ताय फुलें तिथ्ना०॥१॥
तोली तलनें हें न बलें । मद दिथतें ले थत्य थलें । थाल्या मेलुनि एतथलें । मालिल ती तिथ्ना०॥२॥
तूं तलि थ्याना ले हलि फाल । न तली ऐथा हा अवित्याल । आह्मां थांदथि वालंवाल । श्रुलत वित्याल धलि धलिती तिथ्ना०॥३॥

यशोदा कृष्णाचा शोध करिते -
पद २ रें -
बाल मुकूंद माझा आनंदाचा कंद श्रीहरि दावा गे सन्निध चुकला ॥बा०॥धृ०॥
निजांगणीं सहजि सहज आपुला आपण खेळतां तन्मय सन्मति असतां होउनि विस्मृति जहालिं विकला ॥बा०॥१॥
जिवींचें जीवन केवल चिद्धन शामसुंदर गुणनिधान ध्यान पाहतां भान नूरत साधूंचा विकला ॥बा०॥२॥
नावडे विषय देह गेह दृश्य स्कल विफल स्नेह जाणीव तो मज कृष्ण जगन्नाथ कोणि भेटवा नयनि अनेकीं एकला ॥बा०॥३॥

पद ३ रें -
तरि शोधूं कवण्या ठाया जाउनि तरि माथा हे बिकट होता श्रीहरि निकट ॥तरि०॥धृ०॥
गृह धन दारादिक व्यवहारा भुललिं फुकट परि आला याचा विट ॥तरि०॥१॥
चिन्मय व्यापक तन्मय मतिचा मन्मथ बळकट करि खटपट ॥तरि०॥२॥
षड्गुण सुंदर मूर्ति जगाची कृष्ण जगन्नाथ धिट अद्वय निपट ॥तरि०॥३॥

श्रीकृष्ण गोपिकांच्या घरीं चोरी करण्यास येतो त्यावेळीं गोपिका आपसांत बोलतात -
पद ४ थें -
नये लक्षितां हरि साक्षी हा करुं काय अंतरीं सांगा ग । वाटे माया सन्मुख आयां हे रचि कार्य कारण भागा ग ॥न०॥१॥
बोला अन्वय व्यतिरेक मन्मति निर्विकल्पचि व्हाया ग । किति चंचल अति निश्चल होय साधूं त्याचि उपाया ग ॥न०॥२॥
गेलें व्यर्थ हें वय ना मिळे करितां प्रपंच विचारा ग । चला पाहुं कृष्ण जगन्नाथ पथ अन्यथा ना विहारा ग ॥न०॥३॥

गोपिका यशोदे प्रत -
पद ५ वें -
ऐक यशोदेबाई हरि हा अगुणी बालक निर्गुण तूझा नेणसि रमणी ऐक ॥धृ०॥
रात्रिस हे मम मंदिरिं श्रीहरि घेउनियां पोरें । पति सेजे निजल्यांतीं विगलीत चिरें । वृश्चिक मुष्टीं धरितो हें काय बरें ॥ऐक०॥१॥
आणुनियां नकुला मम मंदिरिं मोकळितो श्रीहरी । झांकुळलीं भुत ह्मणोनि मग हाक बरी । करितां जन नगरींचे येती समोरी । भूतभयें रिघवेना काय कर्म तरी ॥ऐक०॥२॥
ऐसें संकट दुर्घट जाणुनि गोवळि पुरुषार्थी । परि देवा प्रार्थीं अंतरिं घुसती । प्रजळुनि दिवट्या नयनिं नकुला पहाती । खदखदां हांसुनि गौळी स्वगृहा निघती । ऐसा नाटक श्रीहरी करितो विपत्ती ॥ऐक०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत -
पद ६ वें -
नकूल कैसा कोठुनि तुज मिळाला घोंटूनि पाहतां नेटें अघटीत वाटे मोठें को. न. धृ०॥
वृश्चिकदंशि अहंवृत्ति जैसी जाचवि देहात्मबुद्धि वांचविना कर्म खोटें ॥को०॥१॥
कुश्चित संगति दुश्चित करिती निश्चित न बरी हरि अविचारीं वय लोटे ॥को०॥२॥
नवनित साचे भवनि तयाए भक्षुनियां घेसि कृष्ण जगन्नाथा शब्द खोटे ॥को॥३॥

कृष्ण यशोदे प्रत -
( मलय गव्हरीं अद्भुत शोभा० या चालीवर )
पद ७ वें -
निर्विकल्प सच्चिदानंद मी, नेणति या मातें ॥ केवळ जड तनु शाश्वत मानुनि कल्पिति कामातें ॥धृ०॥
मन्मूर्तीवरि बळकट प्रेमें लंपट मन करिती । विषयदृष्टिनें दिननिशिं हा आकार हृदयिं धरिती । दृश्यचराचर चिन्मय ऐसी वृत्ति न तिळभरि ती । आत्मसुखास्तव आळविती बहु मज निष्कामातें ॥नि०॥१॥
यद्यपि चिद्धन तो मीं या अबलांसि नसे ठावा । केवळ सगुणीं पूर्ण जयाहीं धरिला सद्दावा । जाणुनि मीं अवतारि होय सद्भक्तांच्या गांवा । मायाब्रह्मीं सहज घडे हा स्फुरण धर्म मातें ॥नि०॥२॥
अवस्थात्रयातीत हरिन नवनीत कसा यांचें । जसा तसा असतांचि स्फूर्तिरुप जग नटलों साचें । तंतूपट मृद्धट दृष्टांतें, कारण कार्याचें । कर्ता कृष्ण जगन्नाथ नसुनि घेती नामातें ॥नि०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत -
पद ८ वें -
चिन्मय हरि तो हा गोपिका तुह्मी पावति कां मोहा ॥धृ०॥
अखंड साक्षित्वें पाहतां या न जायेचि कोठें अलक्षी लक्ष लावुनियां पहा ॥चिन्म०॥१॥
आपुला आपण तन्मय असतो न बोले मी खोटें चंचल वृत्ति सांडुनियां रहा ॥चिन्म०॥२॥
कृष्ण जगन्नाथ सदा अनुभवी आत्म सौख्य मोठें । घालितां ज्यावरी आळ वृथा पहा ॥चिन्मय हरि तो हा गोपिका तुह्मी पावति कां मोहा ॥३॥

गोपिका यशोदे प्रत -
पद ९ वें -
बाई नलगे अंत साचा हे सुमति या अनंताचा ॥धृ०॥
ब्रह्मा पोटींचा तो बाळ । ह्मणतो कंसाचा मी काळ । वधिला शंखासुर चांडाळ । घेउनि अवतार मत्स्याचा ॥बाई०॥१॥
अनंत ब्रह्मांडांच्या काया । कल्पुनि नटली जे चिन्माया । ते कथितो हा आपुली जाया । केवळ देव मी देवांचा ॥बाई०॥२॥
घुसळण करितां मज मंदिरीं । निंदुनि वदतो हा श्रीहरी । क्षीरोदधि म्या मथिला नारी । वेष धरिला जैं कूर्माचा ॥बाई०॥३॥
बोलत वराह वेषें भारीं । वधिला हिरण्याक्ष देवारी । पृथ्वी धरिली दाढेवरी । तुह्मां श्रम जल कुंभाचा ॥बाई०॥४॥
चिरतां फळ वस्तूतें पाहे । सांगे नृसिंह तो मी आहे । हिरण्यकशिपू विदारिला हे । सत्यबाप प्रर्‍हादाचा ॥बाई०॥५॥
सांगत स्वरूपें मी निष्काम चिद्धन वामन भार्गवराम । कृष्ण जगन्नाथ आराम । प्रेमळ जाण मद्भक्तांचा ॥बाई नलगे अंत साचा हे सुमति या अनंताचा ॥६॥

पद १० वें -
आत्मगृहीं राहिं हरी रे । गोपिसदनां कां जासी रे ॥आ०॥धृ०॥
तुज सम कोणी त्रिभुवनि आणिक रे । न दिसे मला गुणरासी रे ॥आ०॥१॥
निशिदिनि धंदा तुझाचि गोविंदा रे । जातो कधिं बा त्याचा वासी रे ॥आ०॥२॥
कृष्ण जगन्नाथा विनविति आतां रे । अजुनि तरी न जा त्यांसी रें ॥आत्मगृहीं०॥३॥

यशोदा गोपिकां व्रत -
पद ११ वें -
दीननिशि या हरिसी वैर वाहतां गोपनारी कोप धरुनि व्यर्थ पाहतां ग ॥दीन०॥१॥
कानकाचा कान तुह्मां मानतो कसा ग दाटुनि कलि उद्भवितां वाटे तो कसा ग ॥दीन०॥२॥
तिला निर्मल निश्चल गृहिं व्यात्प गोधना ग । बाष्कळ तुह्मी कृष्ण जगन्नाथ बोध ना ग ॥दीननिशि या हरिसी वैर वाहतां गोपनारी॥०॥३॥

गोपिका यशोदेप्रत -
पद १२ वें -
हरिहाकीं दृश्य सकल नुरविच ग एकाएकीं ॥धृ०॥
पूर्ण मनाचा निश्चय साचा । अनुभव शुद्ध जिवाचा बळला कीं ग । दृश्य सकल०॥हरि०॥१॥
द्रष्टा केवळ स्थूळ घटांचा मूळ होय सूक्ष्माचा फळला कीं ग ॥दृश्य सकल०॥हरि०॥२॥

यशोदा कृष्णाप्रत -
पद १३ वें -
लावियेलें कोणी वेडें हें तुला बालमुकुंद श्रीहरी ॥धृ०॥
नसत्या आज्ञान कृति करिसी कश्चा हेतूला । काय हा मिथ्या आळ घेसी निर्मळ मूळिं तूं तरी ॥लावियेलें०॥१॥
न तुज उचित कधिं रचित हें भवाब्धी सेतूला । सांगतें साच हृषीकेशी राहिं बा निश्चय घरीं ॥लावियेलें०॥२॥
कृष्ण जगन्नाथ तूं या मनी आवडे केतूला । चिद्धना आत्मनिश्चयेंसी भासलें द्वैत ही जरी ॥लावियेलें कोणी वेडें हें तुला बालमुकुंद श्रीहरी॥३॥

यशोदा गोपिकां प्रत -
पद १४ वें -
कुंदरदन हरि सुंदर तनुतरि निंदुं नका यदुराया ॥धृ०॥
इंदिवरवदन इंदुहास अरविंद नयन पुतनारी । विषयांधा मतिमंदा होउनि घालवितां वय वायां ॥कुंद०॥१॥
अज्ञानावृतचित्तें आपण मानितसां वपुधारी । आत्मविचारें शोध करुनि निज अविद्येसि जिंकाया ॥कुंद०॥२॥
कृष्ण जगन्नाथ तुह्मां न कळुनि विकळ होतसां भारिं । सकळ गोपिका मी पण सांडा, निर्विकल्प सुख व्हाया ॥कुंदरदन हरि सुंदर तनु तरि निंदुंनका यदुराया॥३॥

गोपिका यशोदेप्रत -
पद १५ वें -
चटकी चपल मोठा नाटकी साच घटचि नुरवी हट धरुनि मुरारि ॥च०॥धृ०॥
गोपकटकीं एकिं एकट अनेकीं । व्यापक निकट करिं न मिळे कि भारिं ॥च०॥१॥
सकळ त्यजुनि तरि, धरिन मी श्रीहरि । करि नाना परि न वदवति कंसारि ॥च०॥२॥
सुख निर्धारें आत्मविचारें । कृष्ण जगन्नाथ ऐसा असतो संसारीं ॥च०॥३॥

येशोदा कृष्णाप्रत -
पद १६ वें -
ऐसी कैसी रे तूज ये हरि खोडीतरी कोंडिन आजिवरि घडिघडि गोपिघरिं जासिल जरि निश्चय दृढअंतरिं ऐसी०॥धृ०॥
यावर किति विनविति मति माझी निश्चल न करिसि अजुनि विचारी ॥ऐसी०॥१॥
देह गेह संसारिं हंस कंसारि तूंचि मज प्रिय पुतनारी ॥ऐसी०॥२॥
बैस निज सदनिं पैस न जा कधिं कृष्ण जगन्नाथ चित्सुखकारी ॥ऐसी कैसी रे तूज ये हरि खोडीतरी कोंडिन आजिवरि घडिघडि गोपिघरिं॥३॥

यशोदा गोपिकां प्रत -
पद १७ वें -
तो हा आनंदकंद बालमुकुंद नित्य नेणतां । मोहें देह मीपणि गुंतुनि तुह्मी व्यर्थ शीणतां । जनि लाज हे सुखकाज नाकळे वृत्ति कल्पितां ॥तो हा०॥१॥
मुखें शाब्दिक बोल बोलतां हित नोहे तत्वता । करि कोण हें तरि शोध घ्या बरिं अंतरीं स्वता । हरि निश्चल घरिं अखंड आहे साच पाहतां ॥तो हा०॥२॥
वय कां अमोलिक या असद्विषयांत घालितां । दुर्विचारें गांठुनि पापें जोडुनि जन्में भोगितां । ओळखा कृष्ण जगन्नाथ या निश्चयें निजात्मता ॥तो हा आनंदकंद बालमुकुंद नित्यनेणतां०॥३॥

गोपिका यशोदेप्रत
पद १८ वें -
धरुं सच्चिदानंद बालमुकुंद आनंदकंद साचा ग । आत्म निश्चयें तरि अंतरिं परि शब्द न करुं वाच्या ग ॥धरुं०॥१॥
मोठा बाट कीं कटकांत नाटक एकटा जगताचा ग । लटिकें नोहे घटिकेंत गांठिन सत्य शपथ जिवाचा ग ॥धरुं०॥२॥
कृष्ण जगन्नाथ जो चीद्धन तो मी साधिन हट केला ग । निजकारणि अति लंपत मति निष्टक न निजेला ग ॥धरुं सच्चिदानंद बालमुकुंद आनंदकंद साचा ग॥३॥

यशोदा कृष्णा प्रत
पद १९ वें -
तुज साठिं गोपि टपती या भारीं रे । जपुनियां स्वहित विचारि रे तु०॥धृ०॥
साधुनि बहुत परि । धरितिल दृढ जरी । करिसि तूं कायि पूतंनारि रे ॥तुज०॥१॥
त्यजुनि बा मज दुरीं । जावूं नको श्रीहरी । विनवितीं हेंचि वारंवारि रे ॥तुज०॥२॥
कृष्ण जगन्नाथ निज । आत्मपदपंकज । अलक्ष लक्षितां सुखकारि रे ॥तुज०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत
पद २० वें -
हरि निष्क्रीय तरि अंतरिं जरि बाह्य हा करी ॥धृ०॥
वाटति तुह्मां दैवयोगें माया हे खरी । सत्य विस्मृति नासवि धृति लाउनि मीपण छंदा ॥हरि०॥१॥
कोण कोठिल कर्ता याचा शोध घ्या बरीं । घाबरिं असिं व्हाल न कधिं होउनियां मतिमंदा ॥हरि०॥२॥
सांडुनि अज्ञान जाणुनियां ज्ञान सेवा लौकरीं । कृष्ण जगन्नाथ आनंदाचा कंद न वदुनि मुखिं निंदा ॥हरि निष्क्रीय तरि अंतरिं जरि बाह्य हा करी॥३॥

गोपिका यशोदे प्रत
पद २१ वें -
खोटा न मोठा चटकि खरा श्रीहरी । लटिकाचि भ्रम करि आपुला आपण वारी चट०॥धृ०॥
चिदचीद ग्रंथी, सम दृष्टांती । दाढी वेणी बांधितो हा निजतांपुरूषनारी ॥चट०॥१॥
बहुत केले यत्न परी, ग्रंथी भेद नोहे तरी । जे जे मी मी ह्मणती त्यांसी अखंड खंडेना भारीं ॥चट०॥२॥
दर्शन होता निज साक्षित्वें, कृष्ण जगन्नाथें । केली निर्बंध सूख संसारी ॥चटकिखरा श्रीहरि०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत
पद २२ वें -
कैसि करणि तुझी रे ऐसी हरी न बैससि घरीं उगा कां आपुला । जाउनि गोपिसदनि करि छळण नानापरी न शोभे हें तुलां ॥कैसी०॥१॥
निज भजनि लाउनि मज गोडी, रजनि दीन मोडीं, विषयींच्या हेतुला पाहतां स्वरूप घडी घडी न मति होय वेडी प्रपंचीं व्याकुला ॥कैसी०॥२॥
कृष्ण जगन्नाथ सुखमय सुधी, होईल माझी तधीं, न पाडिसी जयिं भुला । तुजविण तरि भवनिधी, तरुं मी कोणे विधी, सांग बापा मुला ॥कैसि करणि तुझी रे ऐसी हरी न बैससि घरीं उगा कां आपुला॥३॥

यशोदा गोपिकां प्रत
पद २३ वें -
नित्य कां न आवडे हा धंदा । गोप युवति तुह्मी कोप बुद्धिनें लोपति या संसारि नि०॥धृ०॥
सत्यासत्यविचारें अंतरीं जाणति मी या हरिला केवलानंदकंदा । अनंत जन्मार्जित पुण्याचा उदय होय कंसारि ॥नित्य०॥१॥
सांडुनियां अविचार करा ग लाग निजस्वहिताचा न वदा मुखें निंदा । चंचल वृत्ति याचि विपत्ती भोगितसां तुह्मी भारीं ॥नित्य०॥२॥
कृष्ण जगन्नाथचि हा सकळां तारकसा मजवाटे नुरवितां दुःखकंदा । स्वात्मसुखें आत्मगृहिं खेळत देखतिं वारंवारीं ॥नित्य०॥३॥

गोपिका यशोदे प्रत
पद २४ वें -
हरिलागीं कांहीं न चले उपाय, जेथें जाऊं तेथें आपण मागें पुढें ठाय ॥ह०॥धृ०॥
सगुणी निर्गुण कळवि हे खुण, वळवि वृत्ति माझि स्वरुपीं तरी या करुं मी काय ॥हरि०॥१॥
प्रतिवृत्तिचा साक्षीं साचा, अलक्ष लक्षुनि पाहतां समुलीं मीपण माझें खाय ॥हरि०॥२॥
आनंद चिद्धन केवल आपण, कृष्ण जगन्नाथ भरला एकचि अंतर्बाह्य ॥हरिलागीं कांहीं न चले उपाय०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत
पद २५ वें -
आइकें कायी वदती या तुज व्रजनारीरे, किती विनविती नानापरी, तूं होऊ नको दुरीं न जायें गोपिघरीं ॥आ०॥धृ०॥
बालमुकुंदा आनंदकंदा छंद न उचित पुतनारीरे । आपुला आपण चराचरीं, खेळसि तो तूं हरी, जाणतें मीं अंतरीं ॥आइकें०॥१॥
लक्षुनि पद निज विषयिक तजविज, किमपीं न होई या संसारि रे । पूर्ण परब्रह्म मूर्ति खरी, स्फुरति न दुसरी, निश्चय आत्मवरी ॥आइकें०॥२॥
कृष्ण जगन्नाथा त्वद्गुणगाथा गातां गातां देहभान वारि रे । ज्ञानभक्ति रस सरोवरीं, तन्मय मति बरी, मज्जन नित्य करी ॥आइकें कायी वदती या तुज व्रज नारी रे॥३॥

यशोदा गोपिकां प्रत -
पद २६ वें -
हरिसम दुसरा हो प्रिय न जगी ॥ह०॥ विसरा विसर ग्रासुनि पाहतां आपला आपण नित्य निश्चल घरिं ह०॥धृ०॥
सच्चित्सुख स्वरूपचि हा मी, अखंड देखतिं स्वानुभवें कीं, न कळुनि कोणी कायि ह्मणोपरि ॥हरिसम०॥१॥
कल्पित सृष्टी कळतां कष्टी, विचार दृष्टी होय न ते मग, जरि हें भासे दृश्य परोपरी ॥हरिसम०॥२॥
सन्मार्गीं जों वृत्ति वळेना, तो कृष्ण जगन्नाथ कळेना, गोपि सकळ तुह्मी किति वदलां तरि ॥हरिसम दुसरा हो प्रिय न जगी०॥३॥

गोपिका यशोदे प्रत
पद २७ वें -
असतां सहज सुख नसताचि दाटुनि दाखवि आपण खेळ महा । चंचल वृत्ती वत्सें नाचवि एकचि श्रीहरि साक्षी पहा ॥असतां०॥१॥
निजतां शयनि निज न पडों दे निज, जागृति स्वप्नहि हा हरितो । अलक्ष केवळ न लक्षवे गति, तन्मय आत्मवीं करितो ॥असतां०॥२॥
जिकडे तिकडे व्यापक स्फुरतो, चिन्मय बुद्धिंत शुद्ध मला । कृष्ण जगन्नाथ निर्गुण सगुणी, अनुभव नकळुनि जन भ्रमला ॥असतां०॥३॥

यशोदा गोपिका प्रत -
पद २८ वें -
आनंदि आनंद दाटे एक चिद्धन केवल तोचि हा जाणतिं अंतरिं ॥आनंदिं०॥धृ०॥
अच्युत अनंत पूतनारी, नेणतां न होता पूतनारी, स्मरतां त्रिविध ताप वारि, पापनुरवि स्वसुख कारि, सदय श्रीहरी ॥आनंदि०॥१॥
हृदय कमल विमल करुनि, सगुण मूर्ति ध्यानि धरुनि, पाहतां देहभान नुरुनि, द्वैत समुळ मीपण हरुनि, आपणचि करी ॥आनंदि०॥२॥
पूर्ण परब्रह्म साच, कृष्ण जगन्नाथ हाच, अन्य तो मनाचा नाच, उठति विषय कल्पनाच, अज्ञान हें तरी ॥आनंदि०॥३॥

गोपिका यशोदे प्रत
पद २९ वें -
परि सान हरि करि करणीं, बरि ओळखि घ्या तुह्मी सुमति तरि ॥प०॥धृ०॥
न विलोकुंयापरिस बाळ दुजा अवलोकुनि पाहातां चालक हा आत्मगडि सकळ केले आपणा सदृश स्थिति पूर्व पालटुनि भयाचि हरी ॥परि०॥१॥
करुं काय यास न उपाय न सुचे मति कुंठित होती चपळ महा, जप रात्रदिवस मज हाचि सदां अति लंपट वृत्ती सुरसिं खरी ॥परि०॥२॥
गृहदार न कुलस्वविचार स्फुरवि जेथें तेथें कृष्ण जगन्नाथ गोकुळिं पाहा, दधि दुध नवनित भवनांत शिरुनि घट नुरवि सर्व सार एकचि वरी ॥परि सान हरि करि करणीं, बरि ओळखि घ्या तुह्मी सुमति तरि॥३॥

यशोदा कृष्णा प्रत -
पद ३० वें -
करिसि तरि किति हरि हा हट रे । झटुनि व्रज वधुंसि घटचि न ठेविसी अति तुज हें चट रे ॥क०॥धृ०॥
नाटकि ह्मणति नारी लटिकें न तिळभरि जरि श्रवणी कटकट रे । श्रुतिसिद्धनिपटचीज्जगमृद्धट जेविं तंतु पट रे ॥करिसि०॥१॥
प्रपंच आमुचा नुरविसि साचा या वदति सट सट रे । सांडुनि खटपट धरितिल झटपट अनेकिं एकटरे ॥कसिसि०॥२॥
कृष्ण जगन्नाथा तूं निर्भय चीत्सुखमय बळकट रे । तिखट बोल हे फुकट आइकसि राहिं मन्निकट रे ॥करिसि तरि किति हरि हा हट रे०॥३॥

यशोदा गोपिकां प्रत -
पद ३१ वें -
गोप युवति श्रीहरि हा, निश्चल घरिं नांदे पहा ॥धृ०॥
विषयी केवळ लुब्ध तुह्मां क्षुब्ध करिति नित्य महा । काम क्रोध लोभ मोह मत्सरमद शत्रु सहा ॥गोप०॥१॥
साचकिं अति नाचकि मति नाचवि इंद्रियांसि दहा । जाचवि जिव याचें कारण शोधुनि स्वसुखांत रहा ॥गोप०॥२॥
धन्य कृष्ण जगन्नाथ न विसंबे शाश्वत आत्म गृहा । मुक्तिमार्ग विशारद मज भक्ति दे निज सौख्य वहा ॥गोप युवति श्रीहरि हा०॥३॥

गोपिका यशोदे प्रत -
पद ३२ वें -
बाइ न धरिं हृदयिं भय हरि अचाट निज थाट मेळवुनि हा स्वगणान्वित वाट रोधुनि मागें पुढें आपणचि होय न०॥धृ०॥
चोज न वदवे मौजचि केवळ योजुनि पहातां अंत न लागुनि मीपण त्यजुनि राहें होउनियां तन्मय ॥न ध०॥१॥
स्वरुपावरि वृत्ती आवरि द्वैत न तिळभरि, आठवु दे मज हितगुज तजविज आपणचि करि प्रिय ॥न ध०॥२॥
आत्म भजनि लावि आत्मविचारें, कृष्ण जगन्नाथ अगुण सगुणि जेथें तेथें प्रकटुनि आप्णचि खेळे सुखमय ॥न धरिंहृदयिं भय हरि अचाट०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत -
पद ३३ वें -
मुरारे गोपीसी कधीं न जाय आंतरे सुखविचारे विहर मुरारे ॥धृ०॥
तुजकरितां हरि श्रमवुनि कातरी चुकवी अविद्यादि हे अपाय ॥आंतरे०॥१॥
नित्य निरंतर तूं तंव हितकर नावडे त्वदन्य व्यवसाय ॥आंतरे०॥२॥
प्रिय नवनूतन आनंद चिद्धन कृष्ण जगन्नाथ तुझा काय ॥आंतरे सुखविचारे विहर मुरारे॥३॥

गोपिका यशोदे प्रत -
पद ३४ वें -
लाज न तिळ या इलाजचि नचलेग वाजचि दे मजला ॥धृ०॥
काज आणिक साजणि पाहतां ग माजला स्वसुखी भला । सांज सकाळीं हा जगदेखत आत्मरतीं सजला ॥लाज०॥१॥
असतां सहज मज कळउनि निजगुण पळवी द्वैताला । स्वात्मखुणेनें अंतरिं नेउनि साधितो स्वहिताला ॥लाज०॥२॥
स्वस्वरुपीं रत कृष्ण जगन्नाथ अद्वय करितो मला । हरुनि अहंपण स्फुरवितो आपण अंतर्बाह्य एकला ॥लाज०॥३॥

यशोदा कृष्णा प्रत -
पद ३५ वें -
बारे जगज्जीवना कैसें आवडे मना ॥धृ०॥
व्रज वधु या तुजसाठीं, गजबज करिती जाणसीत ना ॥बारे०॥१॥
अगणित गुण तरी, न गणवती हरी वारी देहवासना ॥बारे०॥२॥
कृष्ण जगन्नाथा स्वहितार्था लावी सकलां जना ॥बारे जगज्जीवन कैसें आवडे मना ॥३॥

श्रीकृष्णाच्या मुरलीनादें निमग्न झालेल्या गोपिकांचा परस्पर संवाद -
पद ३६ वें -
मुरलि रविं मुरलि मति ग माझी, मुरलि रविं मुरवी नुरवी संसार घरदार आपपर हरी ॥मुर०॥धृ०॥
प्रापंचीक धंदा हरि गोविंदचि । पय दधी घृत नवनितयुत जातां तरि ॥मुर०॥१॥
अद्वय चीद्धन नित्य निरंजन । तनुमन धनजन वन आपणचि करी ॥मुर०॥२॥
पुरवि मनोरथ कृष्ण जगन्नाथ । दावुनियां आत्मपथ स्वरुपिं निश्चल वरीं ॥मुरलि रविं मुरवि मति ग माझी०॥३॥

गोपिका कृष्णा प्रत -
पद ३७ वें -
कदर नसुनि तुज पदर ओढिसीनीज नदर करुनि मज कोणी पाहाती । सासुश्वशुर पती रजतम हंकृती त्यां आत्मस्थिती न साहती ॥कद०॥१॥
लोकबाह्य आपण कीं श्रीहरी, धर्माधर्मही ना तळती । कळविसि हे स्वानुभवें अंतरीं, नेणती ते जन खळबळती ॥कद०॥२॥
कृष्ण जगन्नाथा तूं सकलां, सुखकर विकला नुरविं मती । त्रिविध ताप हे वारुनि द्यावी, प्रिय परमानंदींच गती ॥कद०॥३॥

गोपिकांचा श्रीकृष्णस्वरूपीं अद्वयानंद -
पद ३८ वें -
आनंद आनंद बाइ सर्वही गोविंद । श्रीहरिसिनृत्यकरिति सकल गोपिवृंद ॥आ०॥धृ०॥
एक रतनिं हस्त धरुनि हुंगिताति बाळा, श्रीगंधें चर्चियेला घेउनियां गळा, वनपुष्पें गुंफुनियां बहुत करुनि माळा, मुख चुंबुनि श्रीहरिच्या घालिताति गळां ॥आनंद०॥१॥
वासना हे कंचुकिचि ग्रंथि बहुत भारीं । जगद्गुरू विलोकनें मुक्त झाल्या नारी । जिवन्मुक्त कृष्ण संगें झालि नदे पुरी । कृष्ण चरणकमलिं गोपि वेधल्या भ्रमरी ॥आनंद०॥२॥
कृष्णरुपीं लीन झाल्या विषय भाग गेला । जगचि कृष्णपणें त्याच्या मोक्ष घरा आला । कृष्ण भूमी आप अनल भाव हाचि झाला । कृष्ण पुरुष प्रकृति गोपी ऐक्य भाव झाला ॥आनंद आनंद बाइ सर्वही गोविंद । श्रीहरिसिनृत्यकरिति सकल गोपिवृंद॥३॥

श्लोक
श्रीकृष्णाच्युत पूर्णब्रह्म त्रिजगद्रूपीच चिद्गोपिका । आत्मानात्म विवेक गोपजन कीं सद्भाव ज्यांचा निका । अद्वैतामृत गोरसानुभव सर्वात्मैक्य घोंटिमती । काला अद्वय हा स्फुरद्रुप निज ज्ञानी सदां पाहती ॥१॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP