मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री पांडुरंगाचीं पदें

श्री पांडुरंगाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
लक्ष लागों निजपदीं पांडुरंगा । न क्षणभरि यिषयिं या जिवाचें अलक्ष आत्म विचारें ॥ल०॥धृ०॥
भ्रमतां करुनि संसारिं रुक्मिणि रमण पहा मी श्रमलों धरुनियां कुमति संगा । दमुनि बहुत तुज नमुनि विनवितों अनात्मत्व परिहारें ॥ल०॥१॥
छंद हृदयिं सच्चिदानंद आपणचि अनुभवें घोटिन न भुलतां दृष्य रंगा । संग रहित निःसंग होउनि श्री सद्गुरु वचन द्वारें ॥ल०॥२॥
वैष्णव सद्गुरु कृष्ण जगन्नाथ तुला सदैव आठवी अद्वयात्मा अभंगा । नव नव हर्षद स्वस्वरुपामृत सेविन निरहंकारें ॥लक्ष लागो निज पदीं पांडुरंगा॥३॥

पद २ रें -
धांव दुरित भंगा हरुनि दुःख संगा । दावि निजात्म रंगा रुक्मिणी पांडुरंगा ॥धृ०॥
कामक्रोधादिक रिपु गांजिति सारे । विषय विष सदृश मारक सारे । जनन मरण देति साहुं कसा रे । दाखविं नयनि मुख कमल ॥धांव०॥१॥
किति विनवुं मि तुज नित्य असा रे । जवळिं असुनि बसविसि कां घसा रे । तुजसाठीं घडि घडि होय मी पिसा रे । पाहेन मूर्ति शामल ॥धा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरण रसा रे । सेउनियां लक्षी निज आत्म कसा रे । मानुनि सकल मिथ्या दृष्य पसारा रे । भजनें हरिसि मानस मळ ॥धांव दुरित भंगा हरुनि दुःख संगा॥३॥

पद ३ रें -
यारे यारे पाहुं पांडुरंग पंढरीचा । भक्तांसाठीं प्रगटला सागा कृपेचा ॥धृ०॥
मुख विलोकितां हरि सुखमय चित्त करी । शंख चक्र पद्म गदा शोभे चतुर्भुज करीं । जीवन जिवाचा प्राणपति भीमकेचा ॥या०॥१॥
बाल वृद्ध सर्व याती, टाळ विणे घेउनि हाती । मुखें विठ्ठल विठ्ठल गाती, सप्रेम दिवस राती । गर्दी मोठी दाट वोट थाटचि मजेचा ॥या०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, विठ्ठल पंढरिनाथ । नारायण वासुदेव, गोविंद गोपाल गात । अखंडानंद घोंटित मूळ जो परेचा ॥यारे यारे पाहुं पांडुरंग पंढरीचा ॥३॥

पद ४ थें -
आजि भला आमुचा दिवस सोनियाचा । परिपूर्ण जाहला प्रेम डोळियाचा ॥धृ०॥
इटेवरि पाहिला देव पंढरीचा । कटीवर कर सोभे हार कुंदरीचा ॥आ०॥१॥
लखलखीत मस्तकीं मुकुट सुवर्णाचा । वरि हिरे चमकती झगमग रत्नाचा ॥आ०॥२॥
करी विणा टाळ किति थाट सज्जनाचा । मुखिं रामकृश्ण हरी छंद भजनाचा ॥आ०॥३॥
मधुर मधुर उठविती शब्द मृदंगाचा । निःसिम गाती ज्या प्रेम अभंगाचा ॥आ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्मणुनि नाचा । हाचि मार्ग समजा मोक्ष साधनाचा ॥आजि भला आमुचा दिवस सोनियाचा॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP