मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
जिवन्मुक्ती निरूपणनाम

जिवन्मुक्ती निरूपणनाम

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


॥ श्रीगणेशायनमः ॥ श्रीआदिपुरुषायनमः ॥
माझा मीचि सदा असें । तेथें कैंचें द्वैत पिसें । नाहीं आहे कल्पीतसें । मज माझी मी जाणे ॥१॥
द्वैत अद्वैत कालविलें । आपणा आपण नाहीं ह्मणे । आपण आपणा आहेपणें । आहे ऐसें माझें भान कदा नाहीं नाहींसें ॥२॥
द्वैत अद्वैत कल्पिलें । सत्यासत्य मीचि केलें । आलें नाहीं गेलें आलें । सकळ माझी कल्पना ॥३॥
मुंगी पासूनि ब्रह्मादिक । लोक कल्पिले अनेक । स्वर्ग नर्क अवश्यक । भोग ते हीं कल्पिले ॥४॥
अवस्था चारी अभिमानी । मंत्रा चरी चारी गुणी । मज माजी मी कल्पोनी । जैसा आहे तैसा मी ॥५॥
पिंड ब्रह्मंडाचा साक्षी । कार्य कारण मी लक्षी । स्थान मान मी परिक्षी । करूनि कर्ता मी ॥६॥
विराट हिरण्यगर्भ माया । चवथी जे कां मूळ माया । स्थूळ कारण माया । महाकारण कल्पिलें ॥७॥
उत्पत्ति स्थिति संहारण । सर्व साक्ष चवथें जाण । जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तूर्या तेही कल्पना ॥८॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । चवथा जाण सर्वेश्वर विश्व तेजस प्रत्यक्पर । आत्मा तेही कल्पिलें ॥९॥
परा पश्यंती मध्यमा । चवथी वाचा वैखरीरवा । ऋक् यजुर्वेद सामा । अथर्वण कल्पिलें ॥१०॥
स्थूळ प्रविक्त आनंद । चवथा भोग अवभासानंद । अकार उकार मकार मत्रार्ध । चारी स्थानें कल्पना ॥११॥
काय भाग्य वर्णूं माझें । मजसीं सांपडलों आज । शून्य कारणासी पूज्य । पडिलें काय वर्णूं मी ॥१२॥
धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं आम्हांसी ॥१३॥
धरितां सद्गुरुचे पाय । कृत कृत्य झाली माय सद्गुरुसी उतराय । होऊं जातां होईना ॥१४॥
ऐसें सांगू जातां फार । कैसा लागे मी पामर । वैष्णवानें दिला कर । वाचा दुर्बळ बोले मी ॥१५॥
कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य झालों मीं ॥१६॥
धन्य माता पिता धन्य । धन्यवंश तो स्वजन । धन्य बंधू की बहिण । माझा संग असे ज्यां ॥१७॥
माझ्या वंशा झाली गती । माझ्या पोटी जगत्पती । माझ्या वंशीं झाले होती । धन्य धन्य माझ्यानें ॥१८॥
ऐसे टांकितां उद्गार । वेडे मज म्हणती नर । होऊं तयांचा उद्धार । माझी निंदा करूनी ॥१९॥
स्वजनाहूनि निंदक जन । जरी सुख त्यां माझे न । मज विपरीत करणें । निंदकांसी आधार ॥२०॥
इति श्रीलघुआत्ममथने । गुरुशिष्य कथने । जिवन्मुक्ती निरूपणनाम षष्टम पद समाप्तः ॥ श्रीरामचंद्रार्पणामस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP