मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री मंगेशाचें पद

श्री मंगेशाचें पद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


श्री मांगिरीश चरणिं शरण तुझ्या, करुणाघन वश व्हावें रे ॥धृ०॥
दमन करित इंद्रिय मन, ऐसें आत्म ज्ञान मज द्यावें रे । स्वरुप सुखानुभवांतचि रंगुनि, चित्त निमग्न असावें रे ॥श्री०॥१॥
सिद्ध शिरोमणि स्वस्मरणानें, लक्ष अलक्षिं बसावें रे । स्वयंजोति आपणासि हृदयिं म्या, उलटुनि आंगें पहावें रे ॥श्री०॥२॥
श्री शिवशंकर जोडुनि उभय कर, विनवितसें तुज भावें रे । वैष्णव कृष्ण जगन्नाथ पदी, मुरवीं दृष्य अभावें रे ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP