मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री बिंदुमाधवाचें पद

श्री बिंदुमाधवाचें पद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


भव सिंधु तरविं बिंदु माधवा रे ॥धृ०॥
बंधु सुत कलत्र नेट । सकळ हा तुझाचि खेळ । पाहेन तुज वेळोवेळ । हेतु हा जिवारे ॥भ०॥१॥
नुरउनि अज्ञान मदा । पुरवि प्रेम हा सुखदा । दुरवुं नको शरण सदा । चरण राजिवारे ॥भ०॥२॥
दाउनि प्रिय आत्मपदा । दे अखंड भक्ति सुधा । लागलि मज हेचि क्षुधा । हरिसि केधवां रे ॥भ०॥३॥
गावूं गुण दिन रजनीं । राहेन निजभक्त जनीं । होउनि सुविरक्त मनीं । प्रीति जेधवां रे ॥भ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ हृदयिं आपणासि ध्यात । आवडिनें नाम गात । नित्य वैभवा रे ॥भ०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP