मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
२१ ते ३०

श्री रामाचीं पदें - २१ ते ३०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद २१ वें -
श्रीराम देव एक दुजा नाहीं । मनन करुनिं मागें परतोनि पाहीं ॥धृ०॥
एक अनेकीं अनेक एकीं । आपुला आपण खोटें मीपण न साहीं ॥श्री०॥१॥
सांडुनि वृत्ती होयीं निवृत्तीं । सुखमय होय जेथें आठवेना कांहीं ॥श्री०॥२॥
विष्णु गुरुकृपा आनंदरूपा । कृष्ण जगन्नाथ भ्रम नुरवि ते ठायीं ॥श्री०॥३॥

पद २२ वें -
तो राम पाहुं सन्मती श्री गुरुप्रसादें ॥तो०॥धृ०॥
सहज सिंहासनीं आपण विराजे । संमुख नाचे मारुती ॥श्री०॥१॥
हळुहळु नाचुनि चैतन्य रामातें । आलिंगी अद्वय स्थिती ॥श्री०॥२॥
देवभक्त नामें हारपुनिं जेथें । मुकावल्या वेद श्रुती ॥श्री०॥३॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ आंगें हें मंद भाग्य नेणतीं ॥श्री०॥४॥

पद २३ वें -
सहज सिव्हांसनीं आत्माराम राजा । केवळ प्राण विसावा माझा ॥धृ०॥
सन्मुख मारुती शोभे उन्मनी ते सीता । लक्ष लक्ष्मण अलक्ष लक्षितां ॥स०॥१॥
पाहातां सकल वृत्ति विराल्या मनाच्या । निरुपम सुख जेथें हारपली वाचा ॥स०॥२॥
विष्णु गुरुचरणीं ठेवितां हा माथा । देहायोष्ये माजी प्राप्ती कृष्णजगन्नाथा ॥स०॥३॥

पद २४ वें -
नाम स्मरुनिं कांहिं काम सकल करीं । शाम सुंदर प्रभु राम करिल कृपा ॥धृ०॥
विपद विराम सर्व सुखाचा आराम । भज केवल मनो विश्राम अद्वय रूपा ॥ना०॥१॥
कां मन तें मग कामनिक होइल । या मधुर रसा सेवुनिं निज अमुपा ॥ना०॥२॥
विष्णु गुरुसिरत कृष्ण जगन्नाथ । विषय तैल न खात प्राप्त ब्रह्मानंद तूपा ॥ना०॥३॥

पद २५ वें -
श्रीरामदासां प्रतिपालक साचा ॥धृ०॥
त्रिभुवन व्यापक इंद्रियचालक आत्मा जीवाचा ॥श्री०॥१॥
मद्भक्तांचा मी अभिमानी देव वदे साचा ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभुनाम स्मरुनि नाचा ॥श्री०॥३॥

पद २६ वें -
चला चला पाहुं चला श्री राम धनी रे । सौख्य तेंचि अनुभवितां न पुर धणी रे ॥धृ०॥
कल्पनेचा उदधि महा घोर हा तरूं रे । आत्म स्मरण हेचि नौका सुदृढ धरूं रे ॥च०॥१॥
भक्ति वल्हें घालुनि धरुं ज्ञान सुकाणें रे । शीड वैराग्याचें लाउनि सावध रहाणें रे ॥च०॥२॥
देहारोग्य वारानुकूल होय जोंवरी रे । तोंवरि हें साधन साधुनिं जाऊं पर तिरीं रे ॥च०॥३॥
लक्ष लक्ष्मण उन्मनि सीता प्रेम मारुती रे । राम सौख्य धाम कृष्ण काम पूरती रे ॥च०॥४॥

पद २७ वें -
सहज सिंहासनीं श्री रघुराय । आत्मा भेटवी श्री गुरुपाय ॥धृ०॥
सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांडा धीप । मुळीं निर्विकार रूप दिसे तें तें वाय ॥स०॥१॥
सांडुनि विषय रति करितां दृष्टि वरती । उडे सन्मुख मारुति जेथें कपिराय ॥स०॥२॥
आनंदमय उडत अद्वय रामचि होत । विष्णु कृष्ण जगन्नाथ ऐक्य भावे ध्याय ॥स०॥३॥

पद २८ वें -
श्रीराम तो मी पाहेन डोळां आवडी ॥धृ०॥
वाहुनिं श्रमलों विषयाशेनें । जन्म मरण कावडी ॥श्री०॥१॥
अनंत ब्रह्मांडें धरि एकला जो । सुमनातें जसे वावडी ॥श्री०॥२॥
वैष्णव गुरुपथ कृष्ण जगन्नाथ । धरितोम साहुनिं चावडी ॥श्री०॥३॥

पद २९ वें -
हृदयीं सदा राम भाऊं भवसागर तरुनी जाऊं ॥धृ०॥
जें सुख दायक नाम निरंतर, भागवतांसह गाऊं ॥हृ०॥१॥
संत समागम साधुनि वेगें, स्वस्वरुपीं मन लाऊं ॥हृ०॥२॥
कृष्णजगन्नाथात्मज वदतो, परब्रह्म सुख पाहूं ॥हृ०॥३॥

पद ३० वें -
अशा मज कोणी कांहिं ह्मणा ॥धृ०॥
धरिलें तें व्रत कदा न सोडूं । श्रीराम स्मरणा ॥अ०॥१॥
लोक लाज मज किमपि न लागे । आत्मैक्य स्फुरणा ॥अ०॥२॥
वंदिल निंदिल ज्या देहा तो अचुक पावे मरणा ॥अ०॥३॥
यास्तव साधुनि संत समागम । करुं निज उद्धरणा ॥अ०॥४॥
विष्णु गुरूच्या कृष्ण जगन्नाथ । आठवितो चरणा ॥अ०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP