मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीकृष्णाचीं पदें

श्रीकृष्णाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
असुनी सुजाण कां नजाणत्यासम गोपी छळिसी । प्राणजीवना, रे कृष्णा प्राण० ॥धृ०॥
इंद्रियवृत्तीं मज नावरतीं या । लक्षुनी प्रमाण, मीं रममाण व्हाया, अंतरसाक्षी । आणित्यें मना रे कृष्णा प्राण जीवना ॥अ०॥१॥
अनुसंधाना चुकविती कान्हा या । चिद्रत्नाचि खाण, आपण आण, - वाहुनि मन्मन कथित्यें । आनंदघनारे कृष्णा प्राण जीवना ॥अ०॥२॥
चंचलचित्ता कृष्ण जगन्नाथा या । नव्हसी लहान, तूं महान, सुमति पाहाना कैसें । मनमोहना रे कृष्णा, मनमोहना ॥अ०॥३॥

पद २ रें -
आला आला पाहुंया कृष्ण द्वारकेचा । भक्त भजन रत प्रियपूर्ण राधिकेचा ॥धृ०॥
शोषुनि करि उद्धार दुष्ट बकीचा । स्वछंद होय हा नंद देवकीचा ॥आ०॥१॥
मंदहसित मुख आनंदकंद मुळिंचा । कृष्ण जगन्नाथ सांपडला गोकुळींचा ॥आ०॥२॥

पद ३ रें -
सद्रसपाना, यदुपति कान्हा, ठकुनि आम्हांना, करी गोपराणा ॥सद्रस०॥धृ०॥
किति नवलाई बोलूं याची थोरी । अंतर्गत दधि नवनीत चोरी । करितो हा आत्मरूप व्रजपोरी ॥चाल॥ कल्पनेचा साक्षि जाण । दशोमति तुझि आण । केवळ चिद्रत्नांची खाण । अनुभव दे निजभजकांना ॥सद्रस०॥१॥
मोठा चेटकि न हा निजतान्हा । आत्मगड्यांसंगें खेळ खेळे नाना । आम्ही जातां यमुनेचे तीरीं स्नाना ॥चाल॥वस्त्रें घेऊनियां जाय  झालों असतां नग्न काय । म्हणे वंदा सूर्यराय । सांडूनियां लाज देहअभिमाना ॥सद्रस०॥२॥
कृष्णजगन्नाथ होय अवतारी । दावूनीयां लीला नव नव तारी । वाटे त्रिजगाचा एक सूत्रधारी ॥चाल॥ धरूं जातां अनुसंधान । चुकवितो व्यवसान । नुरवितो देहभान । कोण जाणे याच्या महिमाना ॥सद्रस०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP