सूर्याद्यैरर्थभानं न हि पुनः कवलैर्नात्र चित्रं
सूर्यात्सूर्यप्रतीतिर्न भवति सहसा नापि चंद्रस्य चंद्रात् ।
अग्नेरग्नेश्च किंतु स्फुरति रविमुखं चक्षुषश्चित्प्रत्युक्तादात्मज्योतिस्ततोऽयं
पुरुष इह महो देवतांना च चित्रम् ॥८७॥
अन्वयार्थ-‘सूर्याद्यैः केवलैः पुनः अर्थभान न हि भवति इति अत्र न चित्रं-’ केवल सूर्यादिकांच्या योगानें विषयज्ञान होत नाहीं, पण यांत कांहीं आश्चर्य नाहीं. ‘सूर्यात् सूर्यप्रतीतिः सहसा न भवति अपि च चंद्रस्य चंद्रात् अग्नेः च न (प्रतीतिः)-’ सूर्यामुळें सूर्यप्रतीति कधींच होत नाहीं. तसेंच चंद्रामुळें चंद्राची व अग्नीमुळें अग्नीचीहि प्रतीति होत नाहीं. ‘किंतु चित्प्रयुक्तात् चक्षुषः रविमुखं स्फुरति-’ तर चैतन्यप्रयुक्त नेत्रांच्या योगानें सूर्यादिक भासतात. ‘ततः अयं पुरुषः आत्मज्योतिः इह देवतांना च चित्रं महः अस्ति-’ यास्तव हा पुरुषच स्वयंज्योति व विषयभोगकालीं (चक्षुरादि) देवतांचें विचित्र तेज आहे. चिंद्रसूर्यादि ज्योति स्वतंत्रपणें विषय प्रकाशित करण्यास समर्थ नाहींत असें येथें सांगतात-केवल सूर्यादि ज्योतींच्या योगानें विषयांचें ज्ञान होत नाहीं, असें जें पूर्वी निरूपण केलें तेच खरें आहे. त्यांत अपूर्व असें कांहीं नाहीं, सूर्यादि देवता आपापल्या विषयांचें ज्ञान करून देतात असें जे लोक समजतात तें मात्र चमत्कारिक आहे. कारण सूर्यामुळें सूर्य, चंद्रामुळें चंद्र किंवा अग्निमुळें अग्नी कधींच प्रतीत होत नाहीं, तर चैतन्ययुक्त नेत्रांनीं त्या सर्वांची प्रतीति येते. (ते सर्व दिसतात.) कारण जात्यन्ध अथवा निद्रित पुरुषाला त्यांची प्रतीति कधींच येत नाहीं, हें सर्वप्रसिद्ध आहे. यास्तव हा आत्मा जाग्रतीत व स्वप्नांतहि आत्मज्योति (स्वप्रकाशरूप, अन्यप्रकाशानिरपेक्ष) आहे; व इंद्रिव्यापाराकालीं चक्षुरादिकांच्या रूपरसादि परस्पर विलक्षण विषयांना प्रकाशित करणारे तेज आहे. याला ‘चित्र देवनामुदगात्’ ही श्रुति प्रमाण आहे.